शेतकऱ्यांना प्राधान्य देवून जलसंपदाची कामे वेळेत पूर्ण करावी:-पालकमंत्री छगन भुजबळ

By : Polticalface Team ,Sun Mar 20 2022 16:34:34 GMT+0530 (India Standard Time)

शेतकऱ्यांना प्राधान्य देवून जलसंपदाची कामे वेळेत पूर्ण करावी:-पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक(प्रतिनिधि): जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा भूसंपादन तसेच नाशिक पाटबंधारे विभागाकडील नाले दुरुस्ती, पुररेषा नियंत्रण, ओझरखेड कालवा चारी दुरूस्ती, विस्तारीकरण व पुल बांधणी, पालखेड डावा कालव्यावर एस्केप गेट बसविणे इत्यादी कामे शेतकऱ्यांना प्राधान्य देवून वेळेत पूर्ण करावीत. तसेच ज्या कामांसाठी शासकीय पातळीवर मान्यतेची आवश्यक आहे, त्या कामांबाबत कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केल्यास शासन स्तरावर सर्वोतपरीने मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, चांदवडचे प्रांताधिकारी सी.एस. देशमुख, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, नाशिक पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नाशिक लघु पाटबंधारे विभागाचे सचिन पाटील, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संगिता जगताप तसेच जयदत्त होळकर, मोहन शेलार, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जलसंपदा विभागांतर्गत प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून समन्वयाने व नियोजनपुर्वक काम करणे आवश्यक आहे. तसेच ज्या भागात भूसंपादनाचा विषय येत असेल त्या ठिकाणी एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून दर निश्चित करण्यात यावा. ज्या ठिकाणी कामे चालु किंवा प्रलंबित आहेत अशा ठीकाणी प्रत्यक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी क्षेत्रिय भेट देवून तेथील प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी नियोजन करावे, अशा सुचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या आहेत. *या कामांचा घेतला आढावा:* दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा काजीसांगवी ता. चांदवड येथील भूसंपादन, नांदूरमध्यमेश्वर ते संवत्सर, खेडलेझुंगे, कानळद पूररेषा निश्चित करणे, रुई, देवगाव, खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद, वाकद शिरवाडे या परिसरात नाल्यांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची दरवर्षी होणारी नुकसान टाळण्यासाठी करावयाची कार्यवाही, देवगाव, रुई, कोळगाव, कानळद (देवगाव) गोदावरी कालवा १५ नंबर व नाला ७ नंबर मोऱ्यापर्यंत खोदकाम करून चर काढणे (पावसाचे पाणी), गोदावरी डावा तट कालवा साखळी क्रमांक २०५०० ते २१३०० मीटर. मध्ये विशेष दुरुस्ती व अंतर्गत कालव्यास अस्तरीकरण करणे या कामाच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळणेबाबत कामांचा प्रस्ताव तयार करून तो तात्काळ सादर करण्यात यावा, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गोदावरी डावा कालवा २५ नंबर चारी जऊळके पासून मुखेड पर्यंत स्वतंत्र करावी, गोदावरी कालवा-चारी क्रमांक ३ मुखेड येथे पाणी मिळत नसल्याने दुरुस्ती करणे, पालखेड डावा कालव्यावर थेट विमोचक बसविणे तसेच ओझरखेड कालव्यातून खडक माळेगाव पाणी पुरवठा योजनेसाठी ४९ किलो मीटर मध्ये एस्केप गेट बसविणे या कामांचा प्रस्ताव तयार करून ही कामे लवकर सुरू करण्यात यावी. तसेच रयत शिक्षण संस्था विंचूर येथे पालखेड डावा कालवा भूमिगत करणेबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, हे कामही लवकरच सुरू करण्यात येईल. पुणेगाव दरसवाडी कालवा किलो मीटर १ ते २५ विस्तारीकरण आणि सदर कालव्यावरील वणी येथील बोगद्याच्या विस्तारीकरणाचे काम, पुणेगाव-दरसवाडी कालवा व दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे अपूर्ण काम यांत्रिकी विभागाकडून पूर्ण करणे, ओझरखेड कालवा दोन उन्हाळी आवर्तने देण्याबाबत. (खडकमाळेगाव), पालखेड डावा कालवा १११ कि.मी. मध्ये कालव्यावर सोनवणे वस्तीकडे जाण्यासाठी पूल बांधणे या कामांचा आढावा घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष