रुमण्याचा मानकरी काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न -मंत्री छगन भुजबळ

By : Polticalface Team ,Sun Mar 20 2022 21:29:19 GMT+0530 (India Standard Time)

रुमण्याचा मानकरी काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न -मंत्री छगन भुजबळ नाशिक,दि.२० मार्च :- बदलत्या काळानुसार कृषी संस्कृतीतल्या जुन्या स्मृती त्यांनी विस्मृतीत न टाकता त्यांना उजाळा दिला आहे. विविध विषयाची मांडणी करणारा हा काव्य संग्रह ग्रामीण जीवनाच्या चरित्राचा भाग वाखाणण्याजोगा आहे. रुमण्याचा मानकरी काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मु.श.औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे कवी जी.पी.खैरनार लिखित रुमण्याचा मानकरी या काव्य संग्रहाचे प्रकाशन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकाशक विलास पोतदार,प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, पोपटराव खैरनार,जिजाबाई खैरनार,सुनीता खैरनार,पांडुरंग खैरनार, मकरंद सोनवणे, पुस्तकाचे लेखक जी.पी.खैरनार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले जी.पी.खैरनार यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सद्या ते जिल्हा परिषद नाशिक येथे औषध निर्माण अधिकारी या पदावर कार्यरत आहे. जिल्हा परिषदेत आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांनी आपली वाचन आणि लेखनाची आवड जोपासली असून त्यांचा रुमण्याचा मानकरी हा तिसरा कविता संग्रह आज प्रकाशित होत आहे.आज प्रकाशित होणारे त्यांचे तिसरे काव्य संग्रह व पाचवे पुस्तक आहे.शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ग्रामीण जीवन तेथील घटना, निसर्ग, शेतीपूरक व्यवसाय, गाय, बैल, म्हैस पाळीव प्राणी यांच्यावर आधारित वास्तव कवितांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, रुमण्याचा मानकरी हा त्यांचा ५२ कवितांचा तिसरा काव्यसंग्रह असून यामध्ये कृषी, कोरोना, मायबाप, मूल्य संस्कृती, सणोत्सव, व्यक्तीचित्रण, कुटुंब, प्राणी पक्षी आदी संबंधीच्या कवितांचा समावेश आहे. या कविता संग्रहातील ५२ कवितांची शब्दकळा साधी, सोपी आणि सुगम आहे. कवितांची मांडणी अगदी सहज सोप्या भाषेत केल्याने त्या वाचनीय ठरतात. फुले दाम्पत्य, अनाथांची माय यासह लिहिलेल्या विविध कविता समाजाच्या परिवर्तनास उपयोगी ठरतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, नाशिकला कला क्रीडा क्षेत्रात अतिशय मोठी परंपरा लाभली आहे. वसंत कानेटकर या भूमीतुन पुढे आले त्यांचे साहित्य नाटकं अतिशय लोकप्रिय ठरली. काशिनाथ घाणेकर यांनी भूमिका केलेलं हे नाटकं बघण्याच भाग्य मला लाभलं असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी लेखक जी.पी.खैरनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष