ओबीसींचा प्रश्न आला की तुमचा आमचा आवाज एक असला पाहिजे- छगन भुजबळ

By : Polticalface Team ,Sun Mar 20 2022 21:32:32 GMT+0530 (India Standard Time)

ओबीसींचा प्रश्न आला की तुमचा आमचा आवाज एक असला पाहिजे- छगन भुजबळ नाशिक,दि.२० मार्च :- ओबीसींमध्ये धनगर समाज हा महत्वाचा घटक आहे. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे अशी मागणी आहे.परंतु सध्या ओबीसी आरक्षणावर गदा आली असून या लढाईत एकत्रित सामील व्हावे. आरक्षणाची लढाई लढायची असेल सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रिमंडळात पाठपुरावा करू असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकच्या कालिदास कालामंदिर येथे पुण्यश्लोक फाउंडेशन आयोजित हिंदुस्थानचा युगपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा मंत्री छगन भुजबळ व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राज्यमंत्री दतात्रय भरणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार हरिदास भदे, प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे,दत्तू बोडके, पत्रकार धंनजय तांदले, समाधान बागल, शिवाजीराव ढेपले, गणपत कांदळकर, शिवाजी सुपनर, आनंदा कांदळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्यात सिंहाचा वाटा असणारं नाव सुभेदार मल्हारराव होळकर याचं होत.अवघ्या वीस वर्षांतच मल्हाररावांनी ७४ लक्षांचा मुलुख ताब्यात घेतला. उत्तर भारतात मराठी सत्तेचा विस्तार करुन मराठी साम्राज्य निर्माण केले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात लहान मोठ्या एकंदर ५२ लढायांत सहभाग घेतला. ते फक्त युद्ध कलेत निष्णात नव्हते तर,राजकारण व राज्यकारभारातही चाणाक्ष होते. पेशव्यांच्या दरबारात त्यांना वडीलकीचा मान होता. ते म्हणाले की, रत्नपारखी नजर असलेल्या मल्हाररावांनी आपला मुलगा खंडेराव यांचा विवाह चौंडीचे माणकोजी पाटील यांची कन्या अहिल्याबाई यांचेशी केला. कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांचा मृत्यु झाल्यानंतर अहिल्यादेवी सती जायला निघाल्या होत्या. परंतु मल्हाररावांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. आता तु माझी सुन नसुन माझा मुलगा खंडुच आहे. कसे म्हणून राज्याची सर्व धुरा अहिल्यादेवींकडे सोपवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने ऊभे केलेले स्वराज्य निष्ठेने वाढविण्याच्या कामी त्यांच्या अर्धशतकाची कारकिर्द सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखी आहे.मल्हाररावांनी आपले सर्वस्व पणाला लाऊन मराठा साम्राज्याच्या सीमा सिंधू नदीपर्यंत वाढविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, माझ्या राजकीय जडणघडणीत धनगर समाजाचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. ओबीसी प्रश्न आला की तुमचा आमचा आवाज एक असला पाहिजे. ओबीसी समाजातील जाती आणि पोटजातींनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.राज्यातील ५४ टक्के समाज एकत्र आला तर राज्याचे आणि देशाचे चित्र वेगळं असेल. धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत आपण मंत्रिमंडळात मांडून ती सोडविली जाईल. समाजात फूट न पाडता एकत्रित येऊया असे त्यांनी सांगितले. तसेच चांदवडच्या रंगमहालाचे काम पर्यटन मंत्री असतांना सुरू केले आहे, लवकरच या कामाचा आढावा घेऊन उर्वरित काम मार्गी लावले जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, काम करतांना सर्वांना सोबत घेण्याचा माझा प्रयत्न असतो. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असून ओबीसी समाजाच्या प्रश्नांची सोडविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकसंघटीत होऊन काम करावे असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले. ते म्हणाले की, कोरोनामुळे राज्यातील तिजोरीवर ताण निर्माण झाला त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहिली आहे. मात्र येणाऱ्या काळात सर्व कामे मार्गी लावण्यात येतील. समाजाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, समाजापुढे अनेक प्रश आहे येणाऱ्या काळात ते प्रश्न सोडविण्यात येतील असे सांगत खा.शरदचंद्र पवार यांच्यामुळे समाजाला आरक्षण मिळाले त्यामुळे समाजाला अधिक फायदा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. चांदवडचा रंगमहालाच्या विकासासाठी लवकरच निधी मिळवून दिला जाईल असे त्यांनी सांगितले. सोलापूर विद्यापीठात अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या विकासासाठी १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच या स्मारकाचा विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, आमदार हरिभाऊ भदे, शिवाजीराव ढेपले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार धंनजय तांदले तर सूत्रसंचालन कवी प्रा.विष्णू थोरे यांनी केले. हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर या पुरस्काराने यांचा झाला सन्मान यावेळी विभागीय सहनिबंधक मुंबई बाजीराव शिंदे, ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर, साहित्यिक तथा मा.उपजिल्हाधिकारी देविदास चौधरी, उपजिल्हाधिकारी रोहन कुंवर, नाशिक जिल्हा अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेंद्र दुकळे, नगरसेविका पूनमताई मोगरे, प्रगतीशील शेतकरी दत्तू देवकर, उद्योजक बाळासाहेब मुरडनर, जनरल सर्जन डॉ.विजय थोरात, पत्रकार धनंजय वानले, आंतरराष्ट्रीय खेळाडू विजय गाढे यांचा सन्मान करण्यात आला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष