ढवळगाव मध्ये शिवजयंती "कोरोनायोद्धा" सन्मान देऊन अनोख्या पद्धतीने संपन्न

By : Polticalface Team ,Wed Mar 23 2022 13:44:38 GMT+0530 (India Standard Time)

ढवळगाव मध्ये शिवजयंती श्रीगोंदा प्रतिनिधी :- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती ढवळगाव मध्ये अनोख्या पद्धतीने साजरी करुन संपन्न झाली. शिवजयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शिवव्याख्याते प्रा.केशव कातोरे मा. सरपंच विजय शिंदे,मा.उपसरपंच रवींद्र शिंदे अनिल वाळुंज पत्रकार अमोल बोरगे,पत्रकार पंकज गणवीर,राम शिंदे सर यांच्या हस्ते पूजन करून झाली. त्यानंतर शिवभक्त शिवव्याख्याते प्रा.केशव कातोरे यांच्या पहाडी आवाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत वर, त्यांच्या शौर्याचा उजाळा देणारे शिवव्याख्यान झाले, या कार्यक्रमासाठी इयत्ता पहिल ते नववीचे विद्यार्थी उपस्थित होते. व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर ढवळगाव मधील कोरोना काळामध्ये ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना योद्धा म्हणून काम केले असे प्राथमिक आरोग्य केंद्र मधील, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस,प्राथमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक कर्मचारी, ग्रामपंचायत ग्रामसेवक व कर्मचारी,ग्रामसुरक्षा दलातील स्वयंसेवक,डॉक्टर्स,पशुवैद्यकीय डॉक्टर,बँक शाखा अधिकारी,गावातील पेट्रोल पंप कर्मचारी, मेडिकल चालक, रेशन दुकानदार व पत्रकार,वायरमेन,तसेच शिरुरचे दानशुर सोन्या-चांदीचे व्यापारी धरमचंद फुलफगर यांचा“कोरोनायोद्धा” म्हणून फुले-शाहू-आंबेडकर विचारक बहुउद्देशीय संस्था(NGO) संचलित आश्रय अनाथ बालसंगोपन वस्तीगृह ढवळगाव यांच्या विद्यमानाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय पोषण आहाराचे प्रात्यक्षिक अंगणवाडी तर्फे शिवव्याख्याते प्रा.केशव कातोरे यांच्या हस्ते करण्यात आले, व सकस पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी मा.सरपंच विजय शिंदे,मा. सरपंच रवींद्र शिंदे,राम शिंदे सर,अनिल वाळुंज, मेजर भाऊसाहेब शिंदे,मेजर पठारे,आप्पा ढवळे,चेरमन भाऊसाहेब ढवळे,नंदा शिंदे,मा.सरपंच तुकाराम बोरगे,दत्तु बोरगे,मनोहर बोरगे,मेजर शरद बोरगे,सुधिर पोखरकर,माणिक लोंढे,मा.सरपंच आनंदा शिंदे,शिवाजी शिंदे,बापु बोरगे गावातील इतर मान्यवर उपस्थित होते, यावेळी आभार फुले-शाहू-आंबेडकर विचारक बहुउद्देशीय संस्था,संस्थापक अध्यक्ष अमोल बोरगे यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश अवचिते यांनी केले. चौकट :- शिवजयंतीनिमित्त शिवजयंती ला व्यर्थ खर्च न करता, शिवविचारांचे शिव व्याख्यान व कोरोना काळामध्ये ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी केली आशा सर्व क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना संस्थेमार्फत “कोरोनायोद्धा” म्हणून सन्मान व प्रसिद्धी पत्र देऊन गौरव करने संस्थेचे प्रथम कर्तव्य आहे :- (श्री.अमोल बोरगे संस्थापक अध्यक्ष फुले-शाहू-आंबेडकर विचारक बहुउद्देशीय संस्था संचलित आश्रय अनाथ बालसंगोपन वस्तीग्रह ढवळगाव)
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी