वीजप्रश्नी लेखी अश्वासानंतर शेतकर्‍यांचे रास्ता रोको आंदोलन मागे

By : Polticalface Team ,Wed Mar 23 2022 13:47:11 GMT+0530 (India Standard Time)

वीजप्रश्नी लेखी अश्वासानंतर शेतकर्‍यांचे रास्ता रोको आंदोलन मागे श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण,राजापूर,माठ,येवती ढवळगाव म्हसे व इतर काही गावातील तसेच शेतकऱ्यांची पिंपरी चौफुला सबस्टेशने जणू काय चेष्टा लावली की काय असे दिसून येत आहे, सर्वच शेतीमालाचा भाव पडलेला असल्यामुळे अधिच शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे व आता हाता तोंडाला आलेला शेतीमाल पाण्यावाचून डोळ्यादेखत शेतात पाण्या विना जळून चाललेला दिसत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग अतिशय भयान संकटामध्ये सापडलेला आहे व त्यामध्ये या भागामध्ये सध्या तरी पाण्याची शेतीसाठी थोड्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे परंतु विज महामंडळाने आठ ते दहा दिवसापासून पूर्ण वीज कनेक्शन विस्कळीत केली आहे , पाच पाच मिनिटाला लाईट जाणे,होल्टेज कमी जास्त होणे रात्रीची लाईट सोडणे,दोन दिवस लाईट न येणे यामुळे शेतकरी पूर्ण हैराण झालाय या सर्व वीज महामंडळाच्या मनमानी कारभाराला कंटाळून या गावातील शेतकऱ्यांनी थेट दिनांक 22 मार्च रोजी पिंपरी कोलंदर चौफुला येथील सब स्टेशन पुढे शिरूर-श्रीगोंदा रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलनाचा इशारा श्रीगोंदा तहसीलदार,बेलवंडी पोलीस स्टेशन, व सबस्टेशन पिंपरी चौफुला यांना दिला होता व 22 मार्च रोजी सर्व या गावातील शेतकरी सकाळी नऊ ते दहा च्या सुमारास हळूहळू शेतकरी वर्ग जमा झाला परंतु मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्ता रोको मध्ये सामील झाल्यानंतर सब स्टेशन मधील कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ झाली,बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक बोत्रे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, शेतकरी आक्रमक झालेला दिसले असतातच उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित बेलवंडी उपविभागीय अधिकारी मांडुळे साहेब,व बारहात्ते साहेब यांनी शेतकऱ्यांना २२० के.व्ही. लोणी व्यंकनाथ येथुन कोळगांव, बेलवंडी, येळपणे, पिंपरी कोलंदर, मढेवडगांव, इ. उपकेंद्रांना वीजपुरवटा करणेकामी लागणारी व्यवस्था सुरु करण्याचे काम प्रगतीप्रथावर असुन सदर काम दि. २८ मार्च २०२२ पर्यंत पुर्ण होणार आहे.त्यानंतर पुढील दोन दिवसांत वीजपुरवटा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. कारण वरील उपकेंद्रांचा भार १३२ के.व्ही. श्रीगोंदा येथुन कमी होणार आहे. तरी दि.३० मार्च २०२२ पर्यंत वरील सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होईल. तरी आपले रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात यावे, अशा आशयाचे लेखी आश्वासन पत्र दिले,त्यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन थांबवले. यावेळी माजी सभापती संभाजीराजे देविकर,मा.कुकडी सा.का.संचालक बाळासाहेब पठारे,धनंजय मेंगवडे, सचिन चौधरी,अशोक वाखारे,अशोक ईश्वरे गुरुजी,मोहन हार्दे,अमोल पोटावळे,प्रकाष तळेकर,विठ्ठल हार्दे, लक्ष्मण रिकामे,गणेश पवार,सुभास कुटे व रायगव्हाण,राजापूर,माठ,येवती, ढवळगाव,म्हसे या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष