साईनगर येथील शालेय विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप ( मराठी पत्रकार संघाचा उपक्रम )
By : Polticalface Team ,Wed Mar 23 2022 17:29:00 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा(प्रतिनीधी): तालुक्यातील काष्टी (साईनगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळा सुरु झाल्याने उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मान्यवराच्या हस्ते छत्र्या वाटप करण्यात आले.
यावेळी साईसेवा सहकारी संस्थेचे संचालक राजेंद्र भोसले व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अ.नगर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये येथील विद्यार्थ्यांना छत्र्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षिका मिनाताई चाकणे, अपर्णा शेळके, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भोसले म्हणाले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य जिल्ह्यात कौतुकास्पद आहे. कारण जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघ प्रत्येक ठिकाणी सहभाग घेऊन आपले समाज हिताचे विविध उपक्रम राबवित असतात. आज साईनगर जिल्हा परिषद शाळेला त्यानी छत्र्या वाटप करुण ऐन उन्हाळ्यात मुलामुलीना मोठा आधार दिला आहे. मागेही त्यांनी शाळेला वृक्षारोपण करुण दिले. तिच झाडे आज शाळेची शोभा वाढवत आहेत. त्याचे अनुकरण करुण इतरांनी सुध्दा आपला सहभाग शाळेसाठी दिला पाहिजे.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते म्हणाले समाजात कार्याची सुरुवात आपल्या पासून झाली तर इतर त्याचे अनुकरण करतील याचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना होईल म्हणून आम्ही मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून समाज हिताचे उपक्रम घेत असतो.यावेळी प्रास्तविक मिना चाकणे यांनी करुण अपर्णा शेळके यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :