बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय – जगन्नाथ महाराज शास्त्री

By : Polticalface Team ,Thu Mar 24 2022 09:11:17 GMT+0530 (India Standard Time)

बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय – जगन्नाथ महाराज शास्त्री पाथर्डी प्रतिनिधी: समाज सज्ञान व्हावा, त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा प्रकाश पडावा, यासाठी जगात वेळोवेळी महापुरुषांनी जन्म घेतला त्यापैकी एक थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. बाबुजी आव्हाड होत. बाबुजींचा समाजाप्रती उद्देश हा प्रांजळ होता. त्यामुळे बाबुजींनी केलेल्या निष्काम कार्याचे फळ आजची पाथर्डी तालुक्यातील पिढी उपभोगत आहे. म्हणूनच बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता ठरते असे प्रतिपादन श्री क्षेत्र जगदंबागड कारेगाव चे मठाधिपती जगन्नाथ महाराज शास्त्री यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी, मा. आ. बाबुजी आव्हाड यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, पाथर्डीचे उपनगराध्यक्ष नंदूशेठ शेळके, सुनिल साखरे, बबन सबलस, दत्ताशेठ सोनटक्के, महावीर मुनोत, संदीप आव्हाड, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद मेढे, सुरेश कोलते आदी उपस्थित होते. यावेळी बाबूजींच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात वाचनकट्टा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जगन्नाथ महाराज पुढे म्हणाले, बाबुजींनी घालून दिलेल्या आदर्शवत मार्गावर आज पार्थ विद्या प्रसारक मंडळाची वाटचाल सुरु असून संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी आजच्या शैक्षणिक व्यवस्थेला डिजीटल संकल्पनेची जोड दिली आहे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्याधारित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत भरती होण्यासाठी ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच स्पोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून ते सदैव प्रयत्नशील आहेत. यावेळी जेष्ठ साहित्यिक ॲड. अनंत खेळकर यांनी बाबूजींवर तयार केलेल्या कवितेचे वाचन डॉ. अशोक कानडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, सुत्रसंचालन डॉ. अभिमन्यू ढोरमारे तर आभार प्रा. शेखर ससाणे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी