उजनीतून विमानसेवेचे ठिकाण निश्चित ! इंदापूरजवळील कालठणची निवड
                      
                
            
               By : Polticalface Team ,Thu Mar 24 2022 15:03:00 GMT+0530 (India Standard Time)
       
               
                           
              
करमाळा तालुक्यातील कुगाव, चिखलठाण, सोगाव, वाशिंबे, केडगाव ला होणार फायदा
हनुमान जन्मभूमी कुगाव (Kugaon), पंढरपूर (Pandharpur), इंदापूर (Indapur), पुण्याचा (Pune) प्रवास स्वस्तात आणि जलद व्हावा म्हणून उजनी धरणातून (Ujani Dam) विमानसेवा (sea airplane service) सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) माध्यमातून धरणातील तीन ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून, त्यातील दोन ठिकाणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीची ठरणार आहेत. त्यामुळे इंदापूरजवळील कालठण (Kalthan) हे ठिकाण निश्चित करण्यात आले असून, तसा अहवाल नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाला (Ministry of Civil Aviation) पाठविण्यात आला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीनुसार उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर धरणाच्या दरवाजाजवळ एक ठिकाण विमानसेवेसाठी उत्तम आहे. मात्र, धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणावरून धरणाजवळ परवानगी देता येणार नाही, असे उजनी जलाशय व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. तर कुंभारगाव परिसरातील ठिकाणी परदेशातून विविध पक्षी येतात आणि त्या ठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणालाही मान्यता देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कालठणची जागा निश्चित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खासगी टेक्निकल एक्स्पर्ट यांनी त्या ठिकाणांची पाहणी केली आहे. आता नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून त्यांच्या अहवालाचा अभ्यास करून त्यांच्याकडून पुन्हा स्वतंत्रपणे पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, त्याला उजनी जलाशय (जलसंपदा) आणि पर्यावरण विभाग व एअर ट्राफिक कंट्रोल विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे.
उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खासगी तांत्रिक तज्ज्ञांकडून पाहणी झाली. त्यांनी तीन ठिकाणांची पाहणी केली असून त्यापैकी इंदापूरजवळील कालठण हे ठिकाण सोयीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी आमच्याकडून ना-हकरत प्रमाणपत्र दिले जाईल.
_ मा रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी जलाशय व्यवस्थापन
पंढरपूर व हनुमान जन्मभूमीला सहजपणे जाता येणार
उजनी धरणातून विमानसेवा सुरू केल्यानंतर नगर, पुणे, सोलापूर, लातूर यासह विविध जिल्ह्यांतील नागरिकांना विनाविलंब सोयीस्कर प्रवास करता येणार आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने कुगाव च्या हनुमान जन्मभूमीला, पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांचीही सोय होणार असून त्यांना कमी वेळेत त्या ठिकाणी पोचता येणार आहे. पर्यटनवाढीसही मदत होणार आहे. दरम्यान, कालठण ते कुगाव परिसरात वर्षभर पाणी (45 ते 50 मीटर खोल) असते. त्या ठिकाणी उभा व आडवा आठ किलोमीटरचा मार्ग विमानसेवेसाठी आहे. या पार्श्वभूमीवर त्या परिसरात विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
करमाळा तालुका
*प्रतिनिधी अलीम शेख*
उजनी बॅकवाॅटर परिसरातील कुगाव पर्यटन वाढीबाबत कुगाव ग्रामपंचायत च्या तत्कालीन सरपंच सौ तेजस्विनी दयानंद कोकरे यांनी सकारात्मक प्रयत्न व्हावेत म्हणून पुढाकार घेतला होता. तेव्हापासून खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. आता येत्या काळात जल हवाई वाहतूक सेवा सुरू झाल्यावर या परिसरातील अर्थव्यवस्थेला पर्यटनाच्या माध्यमातून प्रचंड चालना मिळणार आहे
_उजनी बॅकवाॅटर टुरिझम ट्रॅन्गल
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष