आरपीआयच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर. मराठा आघाडी जिल्हाध्यक्षपदी डॉ. महेंद्र झिंजाडे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी लोकेश बर्वे तर शहर उपाध्यक्षपदी प्रतिभा आढाव यांची नियुक्ती.

By : Polticalface Team ,Fri Mar 25 2022 13:25:41 GMT+0530 (India Standard Time)


आरपीआयच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर.
मराठा आघाडी जिल्हाध्यक्षपदी डॉ. महेंद्र झिंजाडे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी लोकेश बर्वे तर शहर उपाध्यक्षपदी प्रतिभा आढाव यांची नियुक्ती. अहमदनगर प्रतिनीधी:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात युवा कार्यकर्ते व महिलांनी प्रवेश केला. शहरातील स्वास्तिक चौक येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी मराठा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. महेंद्र झिंजाडे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी लोकेश बर्वे तर शहर उपाध्यक्षपदी प्रतिभा आढाव यांची नियुक्ती करण्यात आली. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करुन नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, नगरसेवक राहुल कांबळे, जिल्ह्याचे नेते संजय कांबळे, तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, युवकर सरचिटणीस गौरव साळवे, तालुका उपाध्यक्ष विशाल कदम, शहर उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन, महिला तालुकाध्यक्ष कविता नेटके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे म्हणाले की, तळागाळातील शोषित व दुर्बल घटकांचे प्रश्‍न आरपीआयच्या माध्यमातून सोडविले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआयची वाटचाल सुरु आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटका पर्यंत घेऊन जाण्याचे कार्य आरपीआयचे कार्यकर्ते करीत आहे. आरपीआय हा एका समाजापुरता मर्यादीत नसून, सर्व समाजाला बरोबर घेऊन पुढे जात आहे. सर्व जाती-धर्माचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचा समावेश असलेल्या बावीस आघाड्या पक्षात जोमाने कार्य करीत आहे. पक्षात महिलांना देखील संधी देण्यात आली असून, महिलांचे प्रश्‍न सोडविण्यास महिला आघाडी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. शहराध्यक्ष किरण दाभाडे यांनी आरपीआयचे संगठन उत्तमपणे सुरु आहे. युवकांच्या माध्यमातून आरपीआय राजकारणात बदल घडविणार आहे. युवक मोठ्या संख्येने पक्षात येत असून, शहरातील प्रत्येक भागात आरपीआयची शाखा सुरु करुन कार्यकर्ते जोडले जाणार असल्याचे सांगितले. नुतन पदाधिकारी यांनी पक्ष वाढविण्यासाठी संगठन करुन वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी युवराज पाखरे, अजय डाके, अनिकेत साळवे, राहुल साळवे, भारत वैरागळ, सुमित हजिजा, विजय कराळे, शौकत शेख, प्रविण वाघमारे, महादू भिंगारदिवे, बंटी गायकवाड, शोभा वाघमारे, पद्मा साळवे, आरती धरणे, यमुना गायकवाड आदींसह युवा कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष