अज्ञात वाहनाच्या धडकेत शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश मोरे यांचा मृत्यू धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात

By : Polticalface Team ,Sat Mar 26 2022 11:26:06 GMT+0530 (India Standard Time)

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश मोरे यांचा मृत्यू 
धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रतिनिधी | बीड बीडहुन लिंबागणेश येथे गावी दुचाकीवरून जात असतांना दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे (वय ४०) यांचा रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता बीड- मांजरसुंबा महामार्गावरील हॉटेल बळीराजासमोरील मंझेरी फाटा येथे घडला. शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे ( वय ४० रा.लिंबागणेश ) हे शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता बीडहुन लिंबागणेश या त्यांच्या गावी दुचाकी (एम.एच.२३ ए.व्ही ००१७ ) ने निघाले होते. वाटेत बीड- मांजरसुंबा महामार्गावर मंझेरी फाट्यावरील हॉटेल बळीराजा समोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळुन डाेक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस पीएसआय डी.बी आवारे, जमादार आनंद मस्के, मदतनीस जी. व्ही. कांदे वाहनचालक खय्युम खान यांच्यासह महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी भेट देवुन पाहणी केली. तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा रूग्णालयात भेट देवुन परिस्थीती जानुन घेतली. पोलिसांनी गणेश मोरे यांचा मृतदेह ताब्यात घेवुन तो बीड जिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मोरे यांच्या पश्चात आई ,एक भाऊ ,पत्नी, मुलगा असा परिवार आहे. -------------- लिंबागणेशवर शोककळा बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील गणेश गोपाळ मोरे हा एक सामान्य कुटूंबातील तरूण कबड्डी खेळाडू होता. मागील २० वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करत असतांना त्याची काही वर्षापूर्वी बीड तालुका उप प्रमुख म्हणून निवड झाली होती. बालाघाटावर शिवसेनेचा एक परिचीत व दांडगा जनसंपर्क असलेला युवा नेता म्हणून त्याची ओळख होती. गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या माध्यमातुन कबड्डी ,व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजीत करून नवनीवन खेळाडू तयार व्हावेत यासाठी तो धडपडत होता. त्याच्या अपघाती मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. ---------------
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी