शेडगाव सोसायटीवर शेंडे,रसाळ यांचा दणदणीत विजय.... विरोधकांच्या चारी मुंड्या चित १३ पैकी १३ जागेवर वर्चस्व...

By : Polticalface Team ,Mon Mar 28 2022 15:43:48 GMT+0530 (India Standard Time)

शेडगाव सोसायटीवर शेंडे,रसाळ यांचा दणदणीत विजय....
विरोधकांच्या चारी मुंड्या चित १३ पैकी १३ जागेवर वर्चस्व... श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागलेल्या शेडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेंडे ,रसाळ यांच्या पॅनलमधील १३ पैकी ११ जणांना भरघोस मतांनी सभासदांनी निवडून दिले तर दोन जण आगोदरच बिनविरोध निवडून आणत विरोधकांना मात्र चारी मुंड्या चित केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या १३ जागेसाठी लागलेल्या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते त्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले मतदान झाल्यानंतर मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर सरपंच विजय शेंडे,नागवडे कारखान्याचे संचालक प्रा.रसाळ गटाच्या सर्व उमेदवारांना सभासदांनी भरघोस मतांनी निवडून आणत विजयाची माळ घेतली. यामध्ये सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी मध्ये रसाळ लक्ष्मण निवृत्ती २७६, भोपळे अमोल बाळासाहेब २७२, शेंडे राजेंद्र गुंडीबा २६९, भदे हौसराव भानुदास २६८, भुजबळ जगन्नाथ गेणु २६१, धेंडे सिताराम बाबू २५०, बेलेकर किसन कोंडीबा २४५, गोरे सखाराम ज्ञानदेव २४० महिला प्रतिनिधी मध्ये भदे सिताबाई रोहिदास २८४, रसाळ सुरेखा मारुती २६१ तर इतर मागास वर्ग प्रतिनिधी मध्ये राऊत दत्तात्रय किसन २५२ मतांनी निवडून आले तर अनुसूचित जाती-जमातींमध्ये झेंडे उत्‍तम एकनाथ तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती मध्ये गोळेकर संपत बयाजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती निवडीनंतर सर्व विजयी उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात होते तर विरोधकांना चारीमुंड्या चीत केल्याने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत होती. माजी सरपंच आणि सरपंच पती विजय शेंडे आणि प्रा.रसाळ हेच विजयाचे खरे दावेदार ठरल्याचे नागरिकांमधून बोलले जात असून विजयी उमेदवारांचे तालुक्यातील सर्वच नेत्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून अभिमान थोरात व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अर्जुन वराळे यांनी काम पाहिले सोसायटी निवडणुक ही येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकीची रंगीत तालीम झाली असून प्रा. रसाळ आणि माजी सरपंच विजय शेंडे यांच्याकडून पुढील रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून त्याची प्रतिक्रिया सोसायटी निवडणुकीत मिळाली असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू असून येणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला नेमकी उमेदवार असणार कोण याबाबत सर्वस्तरातून चर्च या निमित्ताने सुरू झाली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष