येवला शहरात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा ; दिरंगाई खपवून घेणार नाही - मंत्री छगन भुजबळ
By : Polticalface Team ,Tue Mar 29 2022 17:23:29 GMT+0530 (India Standard Time)
येवला,दि.२९ मार्च :- येवला शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यासह अधिकारी व कंत्राटदार यांच्यासमवेत एकत्रित बैठक घेत आढावा घेऊन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची झाडाझडती घेतली. यावेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.अन्यथा कारवाई ला सामोरे जावे लागेल अशी तंबी त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिली.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात येवला शहर व परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी येवला शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी प्रांत अधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्हि बी पाटील, उप कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उन्मेष पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, संजय बनकर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख,दिपक लोणारी, प्रवीण बनकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहारातील सांडपाणी भूमिगत गटार, सिमेंट काँक्रीटीकरण रस्ते, वाचनालय, व्यायामशाळा, शॉपिंग सेंटर, गार्डन, शहर स्वच्छता यासह सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्षात पाहणी केली. येवला शहरात सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. कामाबाबत नागरिकांच्या कुठल्याही तक्रार येणार नाही याची दखल घ्यावी. रखडलेल्या अर्धवट कामे पूर्ण करण्यास दिरंगाई होत असेल तर खपवून घेतले जाणार नाही अशा इशारा देत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.