नाशिकच्या उद्योगांबाबत लवकरच जिल्हा प्रशासनासोबत बैठक; पालकमंत्री छगन भुजबळ

By : Polticalface Team ,Thu Mar 31 2022 08:33:34 GMT+0530 (India Standard Time)

नाशिकच्या उद्योगांबाबत लवकरच जिल्हा प्रशासनासोबत बैठक;  पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक,दि.३० मार्च :- नाशिकमध्ये अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नाशिकमध्ये उद्योग क्षेत्रात अधिक गुंतवणूक होण्यासाठी आपण पाठपुरावा करण्यात येईल. त्यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन आणि उद्योजक तसेच विविध कामगार संघटना यांची बैठक घेऊन उद्योजक आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक मधील औद्योगिक शांतता आणि उद्योग वाढीबाबत मी नाशिककर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांनतर भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी डॉ.उदय खरोटे, समन्वयक संजय कोठेकर, आयमाचे मनिष रावल, श्रमिक सेनेचे सुनील बागुल , सिटूचे डॉ. डी. एल. कराड, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे व्यवस्थापक अशोक सोनावणे, नितीन जाधव, निपमचे माजी अध्यक्ष जनार्दन शिंदे, राम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले की, नाशिकमध्ये उद्योगांसाठी अनुकूल असे वातावरण असून याठिकाणी अधिकाधिक उद्योग यावे यासाठी आपले प्रयत्न आहे. यामध्ये केवळ प्रदूषण कारी जे उद्योग आहे त्यांना नाशिक शहरातील औद्योगिक क्षेत्रात विकसित न करता जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहतीत विकसित करण्यास प्राधान्य आहे. त्यातून नाशिकचे हवामान आपण टिकवून ठेऊ शकतो. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने पर्यटन, आयटी यासह इतर उद्योग अधिक वाढतील यासाठी प्रयत्न असून शासनाच्या वतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, नाशिकमधील औद्योगिक शांतता व उद्योग वाढीसाठी उद्योजक तसेच कामगार संघटना एकत्र येऊन मी नाशिककर या चळवळीत काम करत आहे. या चळवळीचे आपण स्वागत करत असून उद्योजक आणि कामगार यांच्या समन्वयातून नाशिकचा औद्योगिक विकास शक्य होणार आहे. यासाठी उद्योगांच्या असलेल्या अडचणींचा अभ्यास करण्यात येऊन त्यादृष्टीने नियोजन करण्यात प्राधान्य देण्यात येईल. नाशिकच्या औद्योगिक शांततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन जिल्हा शांतता समिती पुनर्गठीत करण्यात येईल. यामध्ये उद्योजक, कामगार संघटना, उद्योजक संघटना, समाजसेवी संघटना यांच्या प्रतिनिधींना एकत्रित घेऊन समिती तयार करण्यास प्राधान्य देण्यात येईल. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील. त्यानंतर आपण शासन स्तरावर नवीन उद्योजकांशी संपर्क करून गुंतवणूक वाढविण्यास प्राधान्य देऊ असे त्यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी