वंचित बहुजन आघाडीची आल्हनवाडी येथे घोंगडी बैठक

By : Polticalface Team ,Thu Mar 31 2022 08:35:47 GMT+0530 (India Standard Time)

वंचित बहुजन आघाडीची आल्हनवाडी येथे घोंगडी बैठक पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील आल्हनवाडी येथे वंचित बहुजन आघाडीची घोंगडी बैठक राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मच्छींद्र गव्हाणे होते. यावेळी माजी सरपंच रामदास कर्डीले, पाथर्डी तालुका वंचित बहूजन आघाडी उपाध्यक्ष संपतराव गायकवाड, राजेंद्र झाबंरे,बाळासाहेब फुंदे, अशोक कर्डीले, गोवींद खरात,रामभाऊ सत्रे, लक्ष्मण आढागळे,मछिंद्र श्रीधर सत्रे, रविन्द्र आढागळे आदी मान्यवर उपस्थित होते. वंचित बहूजन आघाड़ीचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, शेवगांव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल, डॉ. अंकुश गायकवाड,व वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली. कायम कुरघोडी करणाऱ्या भाजपा, राष्ट्रवादीच्या चमच्यांनी किसन चव्हाणसर यांचे जनजागृतीचे सडेतोड भाषण सुरु असतांना, गावातील दिवसा लाईट घालवली. मौजे आल्हनवाडी येथील स्वाभिमानी ग्रामस्थांनी सांगितले की, आमच्या गावामध्ये ही पोटात दुखणे असणारी पिलावळ आहे. आता आमच्या गावामध्ये वंचित बहूजन आघाड़ीची शाखा लवकरच उघडायची आहे. प्रा. किसन चव्हाण यांची घोगंडी बैठक आल्हनवाडी येथे होणार, असे कळताच दोन महीन्या पासुन बंद असलेली डीपी बसवण्यात आली. खरोखर वंचित बहूजन आघाड़ीचे कार्य अतिशय चांगले आहे. अधिकाऱ्यावर मा. किसन चव्हाण व त्यांच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा चांगला दबदबा आहे. याचे ज्वलंत उदाहरण डीपी बसवणे हे आहे, असे उपस्थित कार्यकर्ते म्हणाले. आपल्या धारदार भाषणात प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, आपले व आपल्या गावातील कोणतेही प्रलंबीत प्रश्न असतील तर, ते आम्ही योग्य पाठपुरावा करून सोडवू. आतापर्यंत पाथर्डी- शेवगाव तालुक्यातील प्रस्थापित कारखानदारांनी जनतेला गृहीत धरले होते की, लोकांनी आपले प्रश्न घेऊन वाड्यावर ,कारखान्यावर जाऊन मांडायचे परंतु आता ते दिवस संपले आहे. त्यासाठीच आम्ही वंचित चे कार्यकर्ते गावा- गावात जाऊन ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी घोंगडी बैठक अभियान शेवगाव पाथर्डी तालुक्या‍त सुरू केले आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांनी धास्ती घेतली आहे. यापुढे प्रस्थापित कारखानदारांना वंचित बहुजन आघाडी पर्याय देणार आहे. या पुढील सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे. या बैठकी मध्ये आपल्या समस्याचा ग्रामस्थांनी पाढाच वाचला. या बैठकीस मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व स्वाभिमानी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन लक्ष्मण आढागळे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार राजेंद्र झाबंरे यांनी मानले. घोंगडी बैठक संपन्न झाल्या नंतर युवा कार्यकर्ते अशोकराव कर्डीले यांच्या घरी नास्ता आणि चहापान करण्यात आले. त्यानंतर घुमटवाडी येथील शिवसेना नेते नवनाथ चव्हाण यांची प्रा. किसन चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.