सोनोशीतील ब्रह्मनाथ महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण

By : Polticalface Team ,Thu Mar 31 2022 08:36:42 GMT+0530 (India Standard Time)

सोनोशीतील ब्रह्मनाथ महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथील जागृत ग्रामदैवत श्री ब्रह्मनाथ महाराज मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण समारंभ श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. गेल्या दोन वर्षात सोनोशी येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनतर लगेचच लोकवर्गणीतून श्री ब्रह्मनाथ मंदीराच्या शिखराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लक्ष्मीआईचे मंदीरही नव्याने बांधण्यात आले. या सर्व कामाच्या पूर्ततेसाठी दिनांक २८ मार्च सोमवारचा मुहुर्त काढण्यात आला होता. त्या निमित्ताने त्रिदिनी किर्तन समारंभाचे नियोजन करण्यात आलेले होते.आदल्या दिवशी श्रीक्षेत्र गहीनीनाथगडचे महंत विठ्ठल महाराजांच्या उपस्थितीत कलश पुजन करण्यात आले. तर कलशारोहण प्रसंगी सोनोशीकरांचे भगवानगडावर विशेष प्रेम असल्याचे सांगून सर्वांनी भगवानगडच्या वारीसाठी येत जाण्याचे आवाहन केले, त्याला ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. श्री ब्रह्मनाथ महाराज मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाची सांगता मंगळवार रोजी इंदुवासीनी गडाचे साधू त्रिविक्रमशास्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. ह. भ. प. विशाल खोले महाराज व ह. भ. प. आसाराम बडे महाराज यांची ही किर्तनसेवा सोमवार व मंगळवारी झाली. कलशारोहण कार्यक्रमाच्या सर्व खर्चाची रक्कम सोनोशीच्या विवाहित व अविवाहित कन्यांनी केली होती. यावेळी या सर्व कन्यांचा सोनोशीतील स्रीयांनी सन्मान केला. या कार्यक्रमास तारकेश्वरचे आदिनाथ महाराज, येळेश्वरचे रामगिरी महाराज, रामनाथ महाराज, झुंबड महाराज यांच्यासह अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. या कार्यक्रमास सोनोशी पंचक्रोशीतील बहुसंख्य भाविक उपस्थित होते. कोरोना नंतर प्रथमच एकत्र येत हा समारंभ साजरा झाल्यामुळे ग्रामस्थात उत्साहाचे वातावरण होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी