गोविंदराव राठोड यांनी परिस्थितीशी झुंज देत आपली सर्व मुले उच्च विद्याविभूषित केली.... किशोर नाना हंबर्डे

By : Polticalface Team ,Fri Apr 01 2022 20:46:58 GMT+0530 (India Standard Time)

गोविंदराव राठोड यांनी परिस्थितीशी झुंज देत आपली सर्व मुले उच्च विद्याविभूषित केली.... किशोर नाना हंबर्डे आष्टी प्रतिनिधी जागेपणी स्वप्न पाहिली.त्या स्वप्नपूर्तीचा पाठपुरावा केला.गरिबीमुळे शिकता आलं नाही,याची जाणीव ठेवून पाऊल उचलले. पत्नी यशोदा आणि मुलांनी चांगली साथ दिली.त्यामुळेच महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक गोविंदराव राठोड यांनी परिस्थितीशी झुंज देत एक मुलगी कलेक्टर तर दोन मुले डॉक्टर,एक शिक्षण सेवेत उच्चविद्याविभूषित केले.असे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात सेवापुर्ती कार्यक्रमात अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.त्यांचा सेवा गौरव पुरस्कार पूर्ण पोशाख,हार,सोन्याची अंगठी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे, सरस्वती जाधव मॅडम,डॉ.अभय शिंदे,कलेक्टर कन्या संगीता राठोड,प्रा.ज्ञानेश्वर नवले,लक्ष्मण रेडेकर,उपप्राचार्य अविनाश कंदले,शिवम पोकळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी,गरीब,अपघात पीडित,कोव्हीड मध्ये जीव गमावलेल्याचे पाल्य,अशा विविध ग्रस्त कु.आजबे,कु.मोनिका पोकळे,कु.सोनाली बापू साप्ते,कु.सुकन्या बापू साप्ते,ओमकार राजू आजबे,बबन राजू आजबे,प्रसन्न रमाकांत पोतदार,वैभव बाबासाहेब जोगदंड यांना सचिव उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे यांनी महाविद्यालय आणि सहयोग पतसंस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त केला.किशोर नाना हंबर्डे आणि कलेक्टर विद्यार्थिनी संगीता राठोड यांच्या हस्ते कवी प्रा.सय्यद अलाउद्दीन यांच्या अजून मारेकरी सापडत नाही या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष व्ही.एल.शिंदे, सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,प्रा.महेश चौरे, माणिकराव लगड, प्रा.शहाजी माने, प्रा.वसंतराव देशमुख,प्रा.अर्जुन राठोड, प्रा.राम हंबर्डे,प्रा.शंकर काकडे,प्रा. भाऊसाहेब ढोबळे,प्रा.दत्तात्रय रेडेकर, प्रा.भवर,मुख्याध्यापक आजबे,भीमराव गायकवाड,नवनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.सत्काराला गोविंदराव राठोड यांनी उत्तर दिले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुहास गोपने यांनी केले.डॉ.सखाराम वांढरे यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी