प्रिंटींग टेक्नाॅलाॅजी प्रवेश क्षमता पूर्ववत ६० करा;सहसंचालकांचे MSBTE ला पत्र, आंदोलनाचे यश:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,
गणेश ढवळे , मनोज जाधव, शार्दुल देशपांडे यांच्या आंदोलनाला यश
By : Polticalface Team ,Fri Apr 01 2022 20:54:01 GMT+0530 (India Standard Time)
बीड शासकीय तंत्रनिकेतन मध्ये असणा-या प्रिटिंग टेक्नाॅलाॅजी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता षडयंत्र रचुन ६० वरून ३० वर आणण्यात आली होती आणि सदरील शाखा बीड येथुन नाशिक येथे कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याविषयी वरिष्ठ स्तरावरून हालचाली सुरू होत्या त्यामुळेच दि.१४ मार्च २०२२ रोजी माहिती आधिकार कार्यकर्ते शार्दुल देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शिक्षण हक्क आधिकार कार्यकर्ते मनोज जाधव यांच्यासह भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार अशोक कातखडे,उपाध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेना नितिन सोनावणे ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, शेतकरी नेते राजेंद्र आमटे ,आप जिल्हाध्यक्ष बीड अशोक येडे, सचिव रामधन जमाले आदिंनी जिल्हाधिकारी बीड कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त आदिंना सदर कोर्सची प्रवेश क्षमता ३० वरून पुर्ववत ६० करण्यात यावी याविषयी निवेदन दिले होते.त्याचबरोबर बीड जिल्ह्य़ातील सर्व गोरगरीब, शेतकरी, ऊसतोड, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक कुटुंबातील विद्यार्थी, राजकीय पक्ष,सामजिक संघटना लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा दिला होता.
सहसंचालकांचे MSBTE ला प्रवेश क्षमता पूर्ववत ६० करण्याविषयी पत्र;आंदोलनाचे यश :-डाॅ.गणेश ढवळे
सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय औरंगाबाद उमेश नागदेवे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाची गंभीर दखल घेऊन बीडच्या प्रिटींग टेक्नाॅलाॅजी कोर्सची प्रवेश क्षमता पूर्ववत ६० करण्यात यावी याबाबत संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी स्वतंत्र लढा देणार:- अड.शार्दुल देशपांडे
बीड येथील प्रिटींग टेक्नाॅलाॅजी (मुद्रण तंत्र)पदविका अभ्यासक्रम शासकीय तंत्रनिकेतन बीड येथे १९९६ पासुन सुरू असून रोजगाराची १०० टक्के हमी देणारा कोर्स महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि बीड येथेच उपलब्ध असून प्रवेश क्षमता ६० वरून ३० वर करत ईतरत्र नाशिक या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या वरीष्ठ स्तरावरील षडयंत्राच्या विरोधात जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी रस्त्यावर व मंत्रालयीन स्तरावर लढा उभारण्यात येईल.
संचालकांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा - मनोज जाधव
सहसंचालक यांनी दिलेल्या पत्रा नुसार संचालकने लवकरात लवकर निर्णय घ्यावा हा आमच्या सर्वांच्या लढ्याला आलेले यश आहे अशी प्रतिक्रिया मनोज जाधव यांनी व्यक्त केली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.