25 वर्षपासून प्रलंबीत कुकडी भूसंपादन प्रश्न मार्गी - मा. आ.राहुल जगताप

By : Polticalface Team ,Sat Apr 02 2022 18:20:04 GMT+0530 (India Standard Time)

25 वर्षपासून प्रलंबीत कुकडी भूसंपादन  प्रश्न मार्गी - मा. आ.राहुल जगताप श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पासाठी जमिनींचे भूसंपादन झालेल्या मौजे चांडगाव ता.श्रीगोंदा या गावांतील शेतकऱ्यांना माजी आमदार राहूल जगताप यांच्यामुळे राज्य शासनाकडून तब्बल 8 कोटी 90 लाख 53 हजार 154 रुपयांचा निधी दि.31मार्च 2022 रोजी मंजूर करण्यात आलेला आहे. यात चांडगाव येथील 480 भूसंपादनग्रस्थ शेतकऱ्यांचा भूसंपादन प्रश्न मार्गी लागलेला असून यात तब्बल 20 हेक्टर जमीन कृष्णा खोरे महामंडळाकडे वर्ग होणार आहे. कुकडी प्रकल्पासाठी वितारीका क्र 13 लघुवितारीक 6,7,8,10,11 साठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यलयास राज्य शासनाकडून विवरणपत्रानुसार रक्कम तात्काळ जमा करण्यात आलेली असून जेणेकरून अंतिम निवडा जाहीर करण्यासाठी पुढील कार्यवाही सोयीस्कर झालेली आहे. सदरचा मौजे चांडगाव येथील प्रस्ताव 25 वर्षपासून प्रलंबित असल्या कारणाने 31 मार्च 2022 या तरखेपर्यंतच्या व्याजासह संबंधित यंत्रणेकडून परिगणना करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित कार्यलयास निधी जमा करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन झाले खरे. मात्र, मागील 25 वर्षांपासून शेतकऱ्यांना मोबदल्याचे पैसे मिळाले नव्हते. माजी आमदार जगताप यांनी कुकडी प्रकल्पाचा अभ्यास करून शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मोबदल्याच्य मागणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शासनदरबारीही पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक वर्षांपासून अडकून पडलेली रक्कम आता शेतकऱ्यांना मिळनार आहे. मोबदल्याचा पैसा जेव्हा शेतकऱ्यांच्या हातात येतो, तेव्हा शेती व मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांची प्रगती साधली जाते. व्यापार-उद्योगाला चालना मिळते. ही रक्कम मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री मान.ना. श्री. अजितदादा पवार साहेब, जलसंपदामंत्री मान. ना. श्री. जयंतरावजी पाटील साहेब, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब, उपजिल्हाधिकारी उज्वला गाडेकर साहेब व परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा मी आभारी आहे. तसेच सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन. [कुकडी भूसंपादन प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा.आ राहुल जगताप यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरवठा करून सदर निधी मिळवण्यास आम्हास यश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीवहळ्याचा प्रश्न मार्गी लागला असून शेतकरी समाधानी आहे - सोमनाथ म्हस्के सोमनाथ म्हस्के यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करत शासन दरबारी मा.आ.राहुलदादा जगताप यांच्या माध्यमातून चांडगाव कुकडी भूसंपादीत मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्न केले.त्यास यश आले असून मा.आ.राहुल जगताप यांचे मी आभार मानतो. - सरपंच रवींद्र म्हस्के , चांडगाव
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष