अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल

By : Polticalface Team ,Sun Apr 03 2022 15:33:47 GMT+0530 (India Standard Time)

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल नाशिक, दि. २ एप्रिल :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रदेश उपाध्यक्षपदी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अंबादास गारूडकर, अॅड.सुभाष राऊत, तुकाराम बिडकर यांच्यासह प्रा.दिवाकर गमे यांची वर्णी लावण्यात आली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची नुकतीच राज्यस्तरीय आढावा बैठक मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीत कार्यकारिणी बाबत चर्चा होऊन कार्यकारिणीत फेरबदल करण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत करण्यात आलेल्या बदलानुसार प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे नंदुरबार या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्याकडे कोकण विभागातील ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारूडकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष अॅड.सुभाष राऊत यांच्याकडे मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, उस्मानाबादची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम बिडकर यांच्याकडे विदर्भ विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीमची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्ष प्रा.दिवाकर गमे यांच्याकडे नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. नाशिक पूर्व जिल्हाध्यक्षपदी डॉ.योगेश गोसावी तर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांची नियुक्ती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दिलीप खैरे व उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी संतोष डोमे यांची वर्णी लागल्याने नाशिक पूर्व जिल्हाध्यक्षपदी डॉ.योगेश गोसावी तर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश्वर दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे व उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष संतोष डोमे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी