बीड शहर, शासकीय कार्यालये, बसस्थानक आदि ठिकाणी पाणीटंचाई निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिंबु शरबत वाटप आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
By : Polticalface Team ,Sun Apr 03 2022 15:43:10 GMT+0530 (India Standard Time)
बीड शहरातील कोट्यावधी रूपयांच्या अमृत अटल योजनेचे काम पूर्ण झाल्याचा दावा केल्यानंतर सुद्धा मुबलक पाणी असताना बीड शहरात नगरपालिकेच्या ढीसाळ प्रशासनामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना १५ ते २० दिवस पाणी मिळत नसुन शासकीय कार्यालये जिल्हाधिकारी, तहसिल, पंचायत समिती तसेच बसस्थानक आदि ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळेच नागरीकांना विकत पाणी घ्यावे लागते या नगरपरिषद बीड व जिल्हाप्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.०४ एप्रिल सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाणीटंचाई निषेधार्थ लिंबु-शरबत वाटप आंदोलन करण्यात येणार आहे.
अटल योजना पुर्ण झाल्याचा डांगोरा पिटता तर मुबलक पाणी घालून १५-२० दिवसाला पाणी का??
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून अमृत अटल योजना पुर्ण झाल्याचा विविध दैनिकातुन डांगोरा पिटत दैनिकातुन फोटो प्रसिद्ध करत श्रेयवादाची लढाई करत ३ दिवसाला पाणीपुरवठा करू म्हणणारे सध्या शहरातील नागरीकांना १५-२० दिवसाला पाणी येते तरी मुग गिळुन गप्पच आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.
कोट्यावधी रूपयांच्या योजना असताना विकत पाणी घेण्याची वेळ:-डाॅ.गणेश ढवळे
जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासनातील आधिका-यांच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात कोट्यावधी रूपये पाणीपुरवठा योजनांवर खर्च होत असताना शासकीय कार्यालये, जिल्हाधिकारी, तहसिल, पंचायत समिती कार्यालये तसेच बसस्थानकाच्या ठिकाणी उन्हाळ्यात पाणीटंचाई तिव्र जाणवत असल्याने बाटलीबंद विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते,बसस्थानकातील पाणपोई बंद अवस्थेत असुन नागरीकांचे हाल होत आहेत.
वाचक क्रमांक :