आमच्यावर अन्याय झाला की लगेच पक्ष पलटी करतो - सुजय विखे

By : Polticalface Team ,Sun Apr 03 2022 17:49:43 GMT+0530 (India Standard Time)

आमच्यावर अन्याय झाला की लगेच पक्ष पलटी करतो - सुजय विखे प्रतिनिधी श्रीगोंदा: बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सहकरी सोसायटीच्या नुतन वास्तूचे उद्घाटन खासदार सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार ,महाराष्ट्र बाजार समिती संघाचे सदस्य बाळासाहेब नाहटा, भाजपा महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा पाचपुते,संदीप नागवडे,केशव मगर, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के,शंकर पाडळे, राजेंद्र म्हस्के, म्हस्के,यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता.2) सांयकाळी पार पडले. यावेळी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की ज्या पक्षात आम्हाला न्याय मिळतो त्या पक्षात आम्ही जातो, आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही लगेच आम्ही पलटी मारतो अशा शब्दांत खासदार सुजय विखे यांनी पक्षाबाबत भूमिका मांडली. त्याचबरोबर अण्णासाहेब शेलार हे कै बाळासाहेब विखे यांच्या सानिध्यात वाढलेले कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांचं काम अतिशय चांगल आहे. असेही विखे म्हणाले.त्यांनी आधी पक्ष जाहीर करावा नंतर निधी जाहीर करू असेही विखे म्हणाले. आमदार राहुल जगताप बोलताना म्हणाले की सोसायचा कारभार अतिशय सुंदर आहे त्यामुळे या गावात दुसरी सोसायटी तयार झाली नाही.जिल्हा बँकेचे च्या माध्यमातून लागेल ती मदत करण्याचे आश्वासन बँकेचे संचालक राहुल जगताप यांनी दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब शेलार बोलताना म्हणाले की भैरवनाथ सोसायटीचे, 3780 सभासद आहेत, सगळ्यात जास्त कर्ज वाटप या सोसायटी ने केले आहे, खावटी कर्ज पुन्हा शेतकऱ्यांना लवकर वाटप करावे अशी मागणी अण्णासाहेब शेलार यांनी बँकेचे संचालक माजी आमदार राहुल जगताप यांच्याकडे केली. सर्व सभासद यांनी कुठलीही चिंता न करता भैरवनाथ सेवा सोसायटी च्या कामावर विश्वास ठेवून खंबीरपणे उभे राहावे.त्याचबरोबर खासदार सुजय विखे यांचेकडे लोणी ते घारगाव हा बेलवंडी मार्गे रस्ता करण्यात यावा ही मागणी केली. या उदघाटन प्रसंगी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, घनश्याम आण्णा शेलार, बाळासाहेब नाहटा, सुवर्णाताई पाचपुते, विलासराव भोसले, मुरलीधर ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब गिरमकर,अतुल लोखंडे,भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन जयसिंग लबडे, व्हा. चेअरमन स्वप्नील घोडेकर, उपसरपंच उत्तम डाके, व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन सोपान हिरवे,समता पतसंस्थेचे चेअरमन सुनील ढवळे, युवराज पवार, विलासराव भोसले, शंकर लाढाणे,संजय, साळवे, संभाजी वैद्य, ज्ञानेदेव शेलार,भाऊसाहेब दातीर, अरुण डाके, शेषराज काळाने, संदीप बेल्हेकर यांच्यासह परिसरातील सभासद, ग्रामस्थ, कर्मचारी वृंद, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव बाळू ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. केशव कातोरे यांनी केलं तर आभार संजय डाके यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.