गुंडेगाव बनले दारुचा अड्डा, पोलिस प्रशासनाची डोळे झाक

By : Polticalface Team ,Mon Apr 04 2022 13:55:42 GMT+0530 (India Standard Time)

गुंडेगाव बनले  दारुचा अड्डा, पोलिस प्रशासनाची डोळे झाक प्रतिनिधी (दादासाहेब जावळे) : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे अनेक ठिकाणी दारुचा अड्डा बनला आहेत. गावातील एक अत्यंत वर्दळीचा रस्ता. महाविद्यालये, शाळा, विद्यार्थी, विद्यार्थिनींचा येण्या जाण्याचा रस्ता . रस्त्यावरील गजबजलेला गावातील वेशीजवळील छत्रपती शिवाजी महाराज झेंडा चौक.चौकात अनेक किराणा दुकान, कृषी केंद्र , बसथांबा. महिला-मुलींचा आणि अबालवृद्धांचा दिवसभर वावर. चौकाच्या बाजुला आदर्श ग्रामपंचायत कार्यालय आणि तलाठी कार्यालय, बॅंक, पतसंस्था, या भररस्त्यावर दिवसभर दारू पिणारे लोक.बिहारमध्ये शोभावा असा हा प्रकार आपल्या सुसंस्कृत, गुंड ॠषीच्या पावन भूमीत राजरोसपणे अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी अवैद्य दारु विक्री सुरू आहे. एका स्टिंग ऑपरेशन मधून हे भयंकर वास्तव उघड झाले आहे. पोलिस प्रशासनाला का करावी लागते डोळे झाक नगर तालुका पोलिस स्टेशन करणार का कारवाई ?महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधन्य असेल, गुन्हेगारीचा दर कमी होईल आणि गावातील दारूबंदी साठी नगर तालुका पोलिस स्टेशन चे दंबग पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप साहेब याबाबत दखल घेतील काय? अवैद्य दारु विक्री बंदचा शब्द महिलांना देतील काय? नगर तालुका पोलीस हद्दीत राजरोसपणे हे घडू देणाऱ्या ठाणेदार आमंलदारावर कारवाई करतात की, काही कारणे सांगून बेकायदा दारु विक्री वृत्तीला बळ देतात, याकडे गुंडेगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले असेलच! गुंडेगाव ग्रामपंचायत कार्यालय हाकेच्या अंतरावर, संरपच मंगलताई सकट, उपसंरपच संतोष भापकर ,ग्रामपंचायत सदस्य घेणार का दखल?दिवसभर आणि रात्रीही ज्या मुख्य मार्गावर दारू ढोसली जाते त्याच मार्गावर व्यसनमुक्ती ,दारूबंदीची देशभर चळवळ राबविणाऱ्या जेष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी यांचे कार्यालय आहे. उघडपणे चालणाऱ्या दारूच्या गुत्त्यामुळे भापकर गुरूजी विचारांनी प्रेरित होऊन दूरदूरून येणारे अभ्यासक, शासकीय अधिकारी बुचकाळ्यातच पडतात. महिला सुरक्षेलाही धोका पोहोचला आहे, गावातील अनेक मंदिर, सार्वजनिक सभामंडप ठिकाणी जुगार अड्डा बनलाय अक्षरशः गुंडेगाव स्मशानभूमीत दारुच्या बाटल्याचा ढिग लागला आहे यामुळे गावाची संस्कृती मलिन होत आसून पोलिस प्रशासनाने डोळे झाक न करता अवैद्य दारु विक्री बंद करण्यात यावी आशी मागणी गुंडेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे..
" गुंडेगाव येथे दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता, पण पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दारूबंदी फक्त कागदावरच राहिली, पुढील काळात दारूबंदी साठी प्रयत्न करणार "... ..... राजाराम भापकर ( जेष्ठ समाजसेवक गुंडेगाव )
" गुंडेगाव ग्रामपंचायत हद्दीतीत अवैद्य दारु विक्री बंद करण्यात आली आहे, पण बेकायदेशीर दारु विक्री होत आसेल तर ती पोलिस प्रशासनाने बंद करण्यात यावी अन्यथा याविरुद्ध पोलिस स्टेशन समोर अंदोलन करण्यात येईल ... .... संतोष भापकर ( उपसंरपच गुंडेगाव)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी