मी वंशज, पण भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार – खा. युवराज संभाजीराजे छत्रपती
By : Polticalface Team ,Tue Apr 05 2022 09:10:34 GMT+0530 (India Standard Time)
नाशिक, दि.४ एप्रिल :- छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा देशात अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची निर्मिती करून आरक्षण दिले. छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केलं आहे. मी त्यांचा वंशज असून त्यांनी केलेलं काम पुढे अविरत सुरु ठेऊन बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचे माझे प्रयत्न आहे. मी जरी वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ यांनी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविला असून ते त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे प्रतिपादन खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज केले. तर बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी आम्ही एकमेकांना ताकद देऊ असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिक येथे आज त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दिलखुलास पणे चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, करण गायकर, योगेश निसाळ, विलास पांगरकर, समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधतांना खा.युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, नाशिक येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनाच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली होती. त्यावेळी घरी येणार अस मी त्यांना सांगितलं होत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून भेट झाली नाही. आज नाशिक येथे कार्यक्रमानिमित्त आलो असता त्यांची भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज आणि नाशिकचा जुना संबंध आहे. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला त्यांनी मोठी मदत केली होती. तसेच पिंपळगाव बसवंत येथील सत्यशोधक चळवळीत काम करणारे सत्यशोधक गणपतराव मोरे यांना त्यांच्या कामाबद्दल अधिक बळ दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांच्या दि.६ मे रोजी असलेल्या स्मृती शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दल आमची चर्चा झाली असून या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जगभरात पोहचविण्यासाठी ही संधी असून त्यादृष्टीने आमच्याकडून संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या भेटीत बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांचे विचार तळागाळातील नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी जरी छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पहिल्यापासूनच समाजात रुजवीत असून ते त्यांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी हा कुठलाही वाद नाही बहुजन समाजासाठी आपला लढा आहे. फार थोडे लोक असा वाद करतात त्याला आपला विरोध आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्रित आल्यावर आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यामुळे बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी निमंत्रण दिले होते. मात्र अनेक दिवसांपासून भेट होऊ शकली नाही. आज त्यांची भेट झाली याचा विशेष आनंद आहे. भेटीमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याशी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी खूप चर्चा झाली. छत्रपती शाहू महाराज हे आमचे देव असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर आम्ही काम करत आहोत. दि.६ मे रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षभर अखिल भारतीय महात्मा फुल समता परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देखील राज्यभर कार्यक्रम घेण्याबाबत खासदार शरदचंद्र पवार साहेबांशी चर्चा करून कार्यक्रम राबविण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, सत्यशोधक समाजाच्या लोकांना शाहू महाराजांनी मोठ पाठबळ दिल व मदत केली. समाजातील वंचित घटकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यामुळे बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही एकमेकांना ताकद देणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, मराठा ओबीसी असा कुठलाही वाद नसून ओबीसी आरक्षणास कुठल्याही लोकप्रतिनिधीने विरोध केलेला नाही. काही विघातक प्रवृत्ती केवळ निवडणुकीच्या वेळेस ओबीसी मराठा वाद पसरविण्याचा प्रयत्न करतात. त्याला जनता बळी पडणार नाही. सद्या देशभरात जे वातावरण आहे, त्याबद्दल वेगळं सांगायला नको असे सांगत फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार देशाला या दलदलीतून वाचवू शकतात असे त्यांनी यावेळी सांगितले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष