By : Polticalface Team ,Tue Apr 05 2022 13:00:43 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा: अग्नीपंख फौंडेशन व महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाने क्रीडा विश्वातील उमलते तारे यांनी विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली भविष्यात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान केला यावेळी पालकांच्या डोळ्यातुन आनंदाश्रू तरारळले.
आंतरराष्ट्रीय महिला मल्ल भाग्यश्री फंड धनश्री फंड विजय पवार कामिनी देवीकर सोनाली मंडलीक (कुस्ती ) दित्य शिंदे (कबड्डी ) ऋषिकेश जांभळे (खो खो) ऋतुपर्ण साळवे( तिरंदाज) यांना सन्मानपत्र व प्रोत्साहन पर बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला
हा सन्मान आमदार बबनराव पाचपुते माजी आमदार राहुल जगताप जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले कुंडलिकराव दरेकर प्राचार्य डॉ ज्ञानदेव म्हस्के तालुका क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाच्या संचालकपदी बाळासाहेब नाहाटा व रयत शिक्षण संस्थेच्या अजीव सेवक पदी राजेंद्र खेडकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
बाबासाहेब भोस म्हणाले कि आम्ही कि साखर कारखानदारांनी खेळाडूंच्या मागे उभे राहण्याची गरज आहे त्यावर बबनराव पाचपुते म्हणाले कि बाबासाहेब! तुम्ही आता साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत तुम्ही सुरुवात आम्ही तुमच्या मागे मागे येतो.
राहुल जगताप यांनी अग्नीपंख फौंडेशनने हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले
भाग्यश्री बिले म्हणाल्या की एक कौतुकाची थाप खेळाडूंसाठी मोठी उर्जा ठरते
यावेळी राहुल जगताप बाळासाहेब नाहाटा प्रशांत दरेकर प्राचार्य डॉ ज्ञानदेव म्हस्के भाग्यश्री फंड यांचीही भाषणे झाली
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार जिल्हा बॅकेच्या संचालिका अनुराधा नागवडे बाजीराव कोरडे नवनाथ बोडखे हनुमंत फंड दत्ता शिर्के सागर बोरुडे अमोल साळवे शहाजी मखरे एल आर पाटील उपस्थितीत होते सुत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले
वाचक क्रमांक :