पूर्वापार जुना वहिवाटीचा रस्ता पूर्ववत खुला करून मिळणे बाबत श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण.
By : Polticalface Team ,Tue Apr 05 2022 14:43:16 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील सि.स. नं 108,109,110 मधील लोकांना येण्या जाण्यासाठी पूर्वीपासून जुना वहिवाटीचा पूर्व-पश्चिम असा महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा सी. स. नं 112 मधुन रस्ता होता व आहे मात्र तेथील इसम दशरथ दगडू कराळे यांनी सदर पूर्वापार वहिवाटेचे रस्त्यावर टपरी टाकून अतिक्रमण केले आहे व रतनबाई देवराम क्षीरसागर यांचे आर.सी.सी बांधकाम चालू असून नमूद रस्त्यावर अतिक्रमण करून जाणे येण्याचा रस्ता पूर्णपणे बंद करून टाकला आहे. त्याबाबत 11/3/2022 रोजी तहसील कार्यालय तसेच ग्रामपंचायत पेडगाव यांच्याकडे अर्ज दिला होता परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही सदर पूर्वापार रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाची प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करून सदर रस्त्यावर झालेले अतिक्रमण त्वरित दूर करून रस्ता पूर्ववत खुला करून मिळावा यासाठी आमरण उपोषण तहसील कार्यालय समोर करण्यात आले.
वाचक क्रमांक :