पाझर तलावावरील अतिक्रमणाबाबत चिंभळे ग्रामंपचायतची टाळाटाळ: तहसिलदार व जिल्हा जलसंधारण अधिकारी व जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली.

By : Polticalface Team ,Wed Apr 06 2022 15:29:47 GMT+0530 (India Standard Time)

पाझर तलावावरील अतिक्रमणाबाबत चिंभळे ग्रामंपचायतची टाळाटाळ: तहसिलदार व जिल्हा जलसंधारण अधिकारी व जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली. श्रीगोंदा प्रतिनिधी दि.६: श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे ग्रामंपचायतीच्या अखत्यारीत असलेल्या पाझर तलाव क्रं.१ वर मोठया प्रमाणात अतिक्रमण झाले असुन त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश तहसिलदार श्रीगोंदा, जिल्हा जलसंधारण अधिकारी व जिल्हा परिषदाचे कार्यकारी अधिकाऱ्यांनी देऊनही ग्रामपंचायत त्याकडे दुलर्भ करत असल्याची तक्रार भाऊसाहेब संपतराव गायकवाड यांनी केली आहे. याबाबत गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पठारवाडी पाझर तलावामध्ये अनेक वर्षापासुन सातत्याने अतिक्रमण होत आहे. शासकीय जागेत मोठमोठे घरे जनावराचे गोठे तसेच शासनाचे अनुदानातुन कांदा चाळ तयार केलेले आहे. संबधीतांचे विरोधात गायकवाड यांनी तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या उपोषणे केली. श्रीगोंदा तहसिलदार यांनी तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा यांनी चिंभळे ग्रामपंचायतीस अतिक्रमण काढण्या संबधी योग्य ते आदेश दिले. मात्र ग्रामपंचायत अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करत आहे. भाऊसाहेब गायकवाड यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असुन त्या निवेदनात गायकवाड म्हणतात दि. १५/११/२००३ सालापासुन सदरील पाझर तलावाचे हस्तांतरण जिल्हा परिषदे ने चिंभळे ग्रामपंचायतीकडे केलेले आहे. या पाझर तलावामध्ये टोलेजंग इमारती शेततळी कांदा चाळ व शेती याकामी मोठया प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहे. अतिक्रमण करणारे समाज कटंक स्थानिकांना दमदाटी करुन दररोज अतिक्रमण वाढवित आहेत. जवळपास ६० एकर असलेला पाझर तलाव केवळ चिंभळे ग्रामंपचायतीच्या दुर्लक्षामुळे १० एकरावरती आलेला आहे. अतिक्रमणधारकांनी पाझर तलावाची सांड अनाधिकृतपणे तोडली असल्याने पाझर तलावातील भुजल पातळी अंत्यत कमी झालेली आहे. अतिक्रमण करणाऱ्या विध्वसंक प्रवृत्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असताना ग्रामपंचायतच्या अर्थपुर्ण संबधामुळे त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. संपुर्ण पाझर तलावाची मोजणी करण्याचे संबधीत अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही ग्रामंपचायतीने आजपर्यत मोजणीची चलन पावती भरलेली नाही. या अतिक्रमण धारकांवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा भाऊसाहेब गायकवाड यांनी दिला आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी