श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयास डॉ.सौ. प्रणॊती राहुलदादा जगताप यांची भेट

By : Polticalface Team ,Wed Apr 06 2022 19:48:40 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयास डॉ.सौ. प्रणॊती राहुलदादा जगताप यांची भेट श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयास कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखान्याच्या संचालिका व ओम गुरुदेव महिला ग्रामीण शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा डॉ.प्रणोतीजगताप पा. यांनी दि. ०५/०४/२०२२ रोजी भेट दिली. ग्रामीण रुग्णालय म्हणजे आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य गरीब रुग्णांसाठी मोठा आधार आहे. त्यामुळे येथे मिळणाऱ्या सुविधा तसेच यांविषयी सविस्तर चर्चा करुन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना सोबत घेत पुर्ण रुग्णालयाची पाहणी त्यांनी केली. एम.डी. मेडिसीन शिक्षण असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना येणाऱ्या अडचणी, सेवा पुरविताना येणाऱ्या समस्या, अपुऱ्या असणाऱ्या सुविधा यांवर सविस्तर चर्चा करणेत आले. ग्रामीण रुग्णालयातील अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग ,ICTC विभाग, अंतररुग्ण विभाग, एक्स-रे कक्ष , शस्त्रक्रिया गृह, प्रसूतिगृह ,नवजात शिशु उपचार कक्ष व समर्पित कोवीड केअर सेंटर या सर्व विभागांना भेट देऊन वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्याकडून माहिती घेतली. येथे अजुन चांगल्या पध्दतीने रुग्णानां सेवा कशापध्दतीने देता येतील, तसेच काय-काय सुधारणा करणे अपेक्षीत आहे यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचेसोबत संवाद साधला. तसेच या भेटिदरम्यान डॉ.प्रणोती जगताप यांनी रुग्णांसमवेत देखील प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांना मिळत असणाऱ्या सेवा सुविधा, उपचार पध्दती याबाबत रुग्णांशी चर्चा केली. रुग्णालयांमध्ये दैनंदिन बाह्यरुग्ण व अंतररुग्ण संख्या याबाबत माहिती घेतली. मासिक प्रसूतीचे प्रमाण याबाबत माहिती घेतली. दैनंदिन रक्त नमुने (Blood tests)तपासणी याबाबत माहिती घेतली. TB रुग्णांच्या बाबतीत थुंकीनमुने ,एक्स-रे सुविधा याबाबत माहिती जाणून घेतली. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना दैनंदिन बाह्यरुग्ण तसेच अंतररुग्ण यांना चांगल्या प्रकारे दर्जेदार सुविधा देणे तसेच त्याबाबत संख्या वाढविणे याबाबत चर्चा करून सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारी उद्भवणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्यासाठी सर्वांना सांगितले. अत्यावश्यक प्रसंगी संदर्भ सेवा(referral services), रक्तसंक्रमण (Blood transfusion),जोखमीच्या गरोदर मातांना(High risk, complicated) संदर्भसेवा, नवजात शिशु च्या बाबतीत उद्भवलेल्या गुंतागुंती याबाबतचे नियोजन व समस्या याबाबत माहिती घेतली व उद्भवणाऱ्या अडचणी कशाप्रकारे प्रतिसाद दिला जातो याबाबत माहिती घेतली. तसेच रुग्ण संख्या वाढविण्याबाबत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणेबाबत सूचना दिल्या. तसेच वैद्यकीय अधिकारी १, वैद्यकीय अधीक्षक १ रिक्त पद भरणेबाबत आरोग्य विभागाची पाठपुराव्याबाबत कळविले. रुग्णालयामध्ये रक्त साठवण केंद्र(Blood storage unit), (Cellcounter,Trunatt machine उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे). अद्ययावत सुविधांसह cardiac ambulance उपलब्धता होणेसाठी वरिष्ठांशी पाठपुरावा करू, ५० बेड बाबततीत चर्चा व पाठपुरावा करणार आहे. रुग्णालयामध्ये स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या .एक्स-रे मशीन अपग्रेडेशन बाबत वरिष्ठांशी चर्चा करू असे कळविले. तसेच माजी आमदार राहुल जगताप यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ग्रामीण रुग्णालयास शासन दरबारी जागा उपलब्ध करुण देण्याबाबत पाठपुरावा करुण लवकरात लवकर काम सुरु कसे होईल याकडे लक्ष दिले जाईल असे सांगितले तसेच यापुढे देखील वेळॊवेळी ग्रामीण रुग्णालयांस भेट देत राहणार असून वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचेशी नेहमी संपर्कात राहून ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगल्या पध्दतीच्या सुविधा व सेवा उपलब्ध होणेसाठी प्रयत्नशील राहणार असलेबाबत सांगितले. वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांनी देखील त्यांना येणाऱ्या समस्यांबाबत संपर्क करावा, समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असे प्रतिपादन डॉ. प्रणोती जगताप यांनी यावेळी केली. याभेटीच्या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खामकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोल्हे, एक्स रे टेक्नीशियन धनंजय भागवत, स्टाफ नर्स महाजन आणि सस्तारे सिस्टर, शिपाई विकास तरटे, दत्तात्रय मेटे, काझी मावशी, ऑफिस स्टाफ संदीप वाघ तसेच नगरसेवक राजू लोखंडे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम पोटे, राजू मोटे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस, दैवत जाधव, सागर बोरुडे, कालिदास जगताप, सुशिलकुमार शिंदे आदि उपस्थित होते .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.