मित्रांबरोबर पोहायला गेलेल्या १४ वर्षीय केतनचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू , काष्टी परिसरात हळहळ

By : Polticalface Team ,Thu Apr 07 2022 09:46:19 GMT+0530 (India Standard Time)

मित्रांबरोबर पोहायला गेलेल्या १४ वर्षीय केतनचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू , काष्टी परिसरात हळहळ श्रीगोंदा: उन्हाळ्याचे दिवस शाळेला दुपार नंतर सुट्टी असल्याने शाळेतून आल्यानंतर मित्राबरोबर पोहायला गेलेल्या केतन शशिकांत लोंढे वय वर्षे १४ याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.केतनचे चुलते सोमनाथ गोविंद लोंढे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करित आहे. सविस्तर माहिती अशी कि श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ( गणेशा ) राहणारा केतन लोंढे हा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे येथे सकाळी सात ते दुपारी साडेबारा पर्यत मुलांची शाळा होते. शाळा सुटल्या नंतर दुपारी एक वाजता सर्व आठ ते दहा मुले येथील शेतकरी राहुल नलवडे यांच्या शेतातील विहिरीवर पोहायला गेले त्यावेळी केतन हा नुकताच पोहायला शिकला होता दोन तास पोहून झाल्यानंतर केतन याने सर्वांची नजर चुकवून विहिरीत गेला. पण त्याचवेळी सर्व मुले बाहेर आली असताना तेथे जबाबदार असणाऱ्या व्यक्तीनी केतन कुठे दिसेना म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरु झाला. तो कुठेच दिसेना म्हणून वेळ न घालविता येथील अमोल मोटे,जीवन कापडे,अमोल देशमुख,गोटु गवते, बंडू चोभे यांनी विहिरीत उड्या मारुण शोध घेतला परंतु नुकतेच घोडचे पाणी आवर्तन येवून गेल्याने येथील विहिरीची पाणी पातळी वाढल्यामुळे जमीन लेवलला पाणी असल्याने येथील तरुणांना पाण्यात खोलपर्यंत जाता येईना त्यावेळी अनेकांची खात्री झाली अनिकेत बुडाला त्यावेळी येथे वीजेचा लंपडाव असल्याने लाईट नाही. अधिकाऱ्यांना विनंती करुण लाईट आल्यानंतर विहिरीवर इंजिन सह पाच विद्युत पंप जोडून पाणी उपसले तेव्हा सायंकाळी चार वाजता केतनचा मृतदेह पाण्यात तळाला सापडला तोपर्यंत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पत्रकार दत्ता पाचपुते यांनी खबर दिल्यानंतर पोलिस घटस्थळी दाखल होवून विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करुण सदर मृतदेह श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी सहा वाजता पाठवून रात्री उशीरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केतन हा इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता शाळेत हुशार असल्यामुळे लाडक्या बबलुचा मृतदेह पाहून आईवडीलांनी हांबरडा फोडला त्यावेळी अनेकांच्या आस्रुचा बांध फुटला. पुढील तपास पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून लहान मुले हे पोहण्यासाठी व पोहायला शिकण्यासाठी शेतातील तळे,विहीर याठिकाणी जात असून त्यांच्याबरोबर कोणीतरी जाणकार सोबत असणे गरजेचे आहे,पोहण्यासाठी गेलेल्या मुलांनसाठी योग्यती खबरदारी पालकांनी घेणे गरजेचे आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.