सहकारातील हुकुमशाहीला आमचा विरोध, अजून धक्के पचविण्याची ताकत ठेवा कैलासतात्या पाचपुते

By : Polticalface Team ,Thu Apr 07 2022 10:15:08 GMT+0530 (India Standard Time)

सहकारातील हुकुमशाहीला आमचा विरोध, अजून धक्के पचविण्याची ताकत ठेवा 
कैलासतात्या  पाचपुते श्रीगोंदा:सहकारमहर्षी काष्टी सहकारी सेवा संस्था ही परिसरातील लोकांसाठी महत्वाची संस्था आहे. मात्र गेल्या काही वर्षात तेथे कारभारी असणाऱ्यांनी संस्था मोडीत काढली आहे. सहकारातील ही संस्था टिकविण्यासाठी तेथील हुकुमशाही पध्दत बदलण्याची गरज आहे. आमचा कोणा व्यक्तीला विरोध नाही मात्र त्या प्रवृत्तीला विरोध असून ही प्रवृत्ती हटविण्यासाठी सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते व सभासद एकत्र आलो आहोत. काही धक्के बसलेत अजून काही बसतील ते पचविण्याची ताकत सत्ताधाऱ्यांनी ठेवावी असा इशारा संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासतात्या पाचपुते यांनी दिला. प्रसिध्दी पत्रकात कैलास तात्या पाचपुते म्हणाले, काष्टी सेवा संस्थेची निवडणूक लागली असून येत्या २२ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे समविचारी कार्यकर्ते एकत्र येवून आम्ही पॅनेल केला आहे. यात कुठला पक्ष, पार्टी, गट असा प्रकार नाही. संस्था वाचवावी एवढाच शुध्द हेतू समोर ठेवून आम्ही निवडणूकीत उतरत आहोत. मात्र याला पक्षीय निवडणूकीचे स्वरुप देवून सत्ताधारी दिशाभुल करीत आहेत. आमच्या सोबत दक्षिणेचे खासदार सुजयदादा विखे,आमदार बबनराव पाचपुते, कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहूल जगताप राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम अण्णा शेलार या सर्व नेत्यांचे कार्यकर्ते सोबत आहेत. असे असताना ही एकट्या पक्षाची निवडणूक आहे अथवा पॅनेल आहे अशी खोटी आणि चुकीची चर्चा जाणीवपूर्वक मुद्दाम केली जात आहे.... सत्ताधाऱ्यांना त्यांचा पराभव आता स्पष्ट दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकु लागली आणि सभासदांना व कार्यकर्त्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरु झाले. आम्ही शांत मार्गाने निववडणूक करणार आहोत. दोनशे कोटींची संस्था 6 कोटी 72 लाखावर (संस्थेच्या 31/12/2021 अहवालानुसार) आली याचा विचार सभासद करतोय. आम्ही सत्ता आल्यावर सोसायटीच्या माध्यमातून हाॅस्पिटल सुरु करणार आहे. त्यासाठी सगळ्या नेत्यांची व पक्षांची मदत घेणार आहोत. संस्था कुठल्या एका गटाची, पक्षाची नसते तर ती सभासदांची असते. तेथून सभासदांना न्याय व सुविधा दोन्हीही अपेक्षीत असतात व त्या देण्याचाच प्रयत्न होईल असेही कैलासतात्या पाचपुते म्हणाले.
पक्षाचा व या निवडणूकीचा संबध जोडू नये- ज्ञानदेव माऊली पाचपुते
साईसेवा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पाचपुते म्हणाले, काष्टी सोसायटी वाचली पाहिजे. पंख्याखाली बसून कारभार होत नसतो, त्यासाठी लोकांच्यात जावे लागते याचे भान सत्ताधाऱ्यांना राहिले नसल्याने सोसायटीचा आर्थिक आलेख घसरला आहे. ही निवडणूक पक्षीय नाही तर विचारांची आहे. म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो असून परिवर्तन झाल्यावर त्याचे सकारात्मक परिमाण समोर येतील.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष