श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा जगताप यांच्या खास निधीतून आरणगाव दुमाला येथील तलावात पाणी पुनर्भरणासाठी उपलब्ध

By : Polticalface Team ,Fri Apr 08 2022 15:15:37 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा जगताप यांच्या खास निधीतून आरणगाव दुमाला येथील तलावात पाणी पुनर्भरणासाठी उपलब्ध श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा जगताप यांच्या खास निधीतून आरणगाव दुमाला येथील तलावात पाणी पुनर्भरणासाठी उपलब्ध करून दिल्याने आज गावच्या तलावात पाणी सोडल्याने प्राणी, पक्षी ,जनावरे, जनावरांसोबत शेतकरी, गावकरी महिला, समाधानी झाल्या असे गौरवोद्गार कुकडीचे संचालक मोहनराव आढाव यांनी व्यक्त केले जल है तो कल है, हा विचार करून भविष्यातील पाणी महत्त्व लक्षात घेत पाणी म्हणजेच जीवन पाणी आडवा पाणी वाचवा पाणी जिरवा पाण्याचा एक एक थेंब जपून वापरा असा मौलिक संदेश आढाव त्यांनी दिला. कुकडी कॅनल गावच्या उत्तरेला आहे तथापि त्या कालव्याच्या अरणगावला काहीच उपयोग होत नव्हता परंतु दर वर्षी उन्हाळ्यात चार महिने ग्रामस्थांना पाणी समस्या भेडसावत होती कुकडीला पाणी आलं की कसेबसे एकच महिना गावाला पाणी पुरवत असे व उर्वरित तीन महिने मात्र माणसं, शेळ्या-मेंढ्या, पक्षी, प्राणी सर्वांचा पाण्यासाठी हवालदिल होत असत. परंतु कार्यसम्राट कुकडीचे संचालक मोहनराव आढाव व ग्रामस्थ यांनी माजी आमदार राहुलदादा जगताप यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व त्यांनी त्यांच्या आमदार फंडातून दहा लाख रुपये देत अरणगावासाठी तलावात पाणी पुनर्भरण यासाठी दहा लाख रुपयांची विशेष तरतूद केली गावच्या पाण्याची समस्या लोकांनी त्यांच्याकडे पोटतिडकीने मांडले नाही गावच्या पाणी प्रश्नाला त्यांनी प्राधान्य दिले गावचे दुर्दैव असे की पाणी उशाला ,कोरड घशाला अशी अवस्था होती .सुमारे 35 ते 38 वर्ष होऊन गेली .गावच्या जवळून कुकडी कॅनल वाहत होता आणि गावाला मात्र पिण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी, प्राणी ,पक्ष्यांना तसेच महिलांना आणि ग्रामस्थांना पाणी प्यायला उपलब्ध नव्हते .आज गावचा पाणी प्रश्न ऐरणीवर होता आज पर्यंत या महत्त्वाच्या समस्येकडे कोणीही लक्ष दिले नाही त्यामुळे कष्टकरी शेतकरी ग्रामस्थ, गुरंढोरं ,शेळ्यामेंढ्या यांचे सर्वांचेच हाल होत होते. परंतु दूरदृष्टीचे संचालक मोहनराव आढाव यांनी ते अचूक ओळखले. नी ग्रामस्थांना सोबत घेऊन पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एकत्र आले. त्यांनी ठरवलं की गावच्या तळ्यात पाणी सोडल्यास आपली उन्हाळ्याची चार पाच महिन्यांची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटू शकते. आत्ता पाण्याची समस्या सुटली आहे.
आज मात्र पाणी तलावात सुटल्याने सर्वांना खूप आनंद झालेला आहे .उद्याची शेतीच्या पाण्याची समस्या जनावरांच्या पाण्याचे पिण्याची समस्या शेतीसोबत गावाच्या पाण्याचे पिण्याची समस्या सुटणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने हेच पुण्यकर्म आहे . - राम पखाले शेतकरी अरणगाव दुमाला चौकट सुमारे तीस-पस्तीस वर्षा पूर्वी गावची पाणी समस्या होती आमदार असताना दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता .आज ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण झाले कारण खरी शेतकऱ्यांची समस्या पाणी असते. आज शेतकऱ्यांच्या सोबत शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटल्याने ग्रामस्थासोबत माता-भगिनी युवक व शेतकरी सुखावला हीच आनंदाची पर्वणी आहे. माजी आमदार राहुलदादा जगताप

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष