एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवार यांचा घरात घुसून चप्पल व दगड फेक
By : Polticalface Team ,Fri Apr 08 2022 20:04:02 GMT+0530 (India Standard Time)
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी आज अतिरेक करताना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराच्या दिशेने मोर्चा नेला. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करताना थेट चप्पल फेकली. त्याचबरोबर दगडफेक सुद्धा करण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक बाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु झाले आहे. आंदोलनाकडून न्याय देण्याची मागणी करण्यात आली. पोलीस कमी असल्याने आंदोलक थेट बंगल्याबाहेर पोहचले. आंदोलकांकडून चप्पलांसह दगड भिरकवण्यात आले .
पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यानंतर आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आता ठिय्या आंदोलन सुरु केले . ठिय्या देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांंकडून जोडे मारो आणि बोंबाबोंब आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
दुसरीकडे एसटी कर्मचार्यांच्या संपाला मुंबई उच्च न्यायालयानेच गुरुवारी अल्टिमेटम दिला. या कर्मचार्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याची शेवटची मुदत न्यायालयाने दिली असून, त्यानंतरही कामावर न येणार्या कर्मचार्यांना काढून टाकण्याचे अधिकार एसटी महामंडळ आणि राज्य सरकारला असतील.
वाचक क्रमांक :