शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थान वर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी - शंभुराजे फरतडे ( युवा सेना तालुका समन्वयक )

By : Polticalface Team ,Fri Apr 08 2022 20:24:48 GMT+0530 (India Standard Time)

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थान वर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी - शंभुराजे फरतडे
( युवा सेना तालुका समन्वयक ) करमाळा प्रतिनिधि एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थान वर झालेल्या हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी युवासेना करमाळा तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात फरतडे यांनी म्हटले आहे की काल न्यायालयातील झालेल्या निकालानंतर एस टी कामगार व त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जल्लोष साजरा केला होता. संप मिटून कामगार कामावर रुजु होतील अशी शक्यता होती मात्र आज दुपारी चार च्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानात हजारो कर्मचारी बेकायदेशीर जमाव जमवून घुसले व चप्पल फेक व दगडफेक केली. संविधाना नुसार सर्वांना आंदोलन करण्याचा कायदेशीर आधिकार आहे मात्र एखाद्या जेष्ठ नेत्यांच्या घरावर बेकायदेशीर घुसून दगडफेक चप्पल फेक करणे हे महाराष्ट्राच्या संस्काराला शोभत नाही.या ठिकाणी सुप्रिया सुळे या हात जोडून विनंती करत असताना देखील आंदोलक आरेरावीची भाषा वापरत होते. हे चिंताजनक आहे. या आंदोलनास कोणाची फुस आहे ,कोणी चिथावणी दिली .याचा निःपक्ष पणे शोध घेतला पाहिजे. कामगारांच्या बाबतीत महाराष्ट्रातील जनता संवेदनशील होती .परंतु आंदोलनाचे राजकीय रुपांतर पाहता हे आंदोलन भरकटले गेले. आज न्यायालयीन निकालानंतर एकीकडे कामगारांचे वकिल गुणरत्न सदावर्ते आनंदोत्सव साजरा करतात व एकीकडे कामगार कायदा हातात घेऊन शरद पवार यांच्या घरावर हल्ला करतात याचा अर्थ काय काढायचा? एस टी कामगार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोण राजकारण करीत असेल, कामगारांच्ये आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते निषेधार्थ आहे. मराठा आरक्षणसाठी अनेक मराठा बांधवानी बलिदान केले.लाखोंचे मोर्चे निघाले मात्र कोणीही चुकीचा शब्द देखील काढला नाही मात्र या आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांकडून हे धाडस कशाच्या जोरावर झाले याची सीबीआय मार्फत कसुन चौकशी करावी व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून महाराष्ट्राची आंदोलन चळवळ बदनाम करणाऱ्यांना धडा शिकवावा आशी मागणी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.