धर्मांध लोकांपासून फुले- शाहू-आंबेडकरांचे विचारच या देशाला वाचवू शकतात- छगन भुजबळ

By : Polticalface Team ,Fri Apr 08 2022 20:29:32 GMT+0530 (India Standard Time)

धर्मांध लोकांपासून फुले- शाहू-आंबेडकरांचे विचारच या देशाला वाचवू शकतात- छगन भुजबळ सोलापूर- दि. ०८ एप्रिल महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न समोर येतील म्हणून देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र या धर्मांध लोकांपासून फुले- शाहू-आंबेडकरांचे विचारच या देशाला वाचवू शकतात असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, दिपकराव साळुंखे, माजी महापौर बापूसाहेब भुजबळ, राष्ट्रवादी सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर जनार्धन कारमपुरी, संतोष पवार, आंबदास गारूडकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष आबा खाडे, शहराध्यक्ष शशिकांत कांबळे, शेखर माने, प्रा. जयंत भंडारे, सायरा शेख, विद्या लोळगे, लतिक तांबोळी, प्रा. कविता मेहेत्रे, दीपाली पांढरे, हरिभाऊ जावंदरे उपस्थित होते... ते म्हणाले की देशात आज धर्मांध लोकांनी उन्माद मांडला आहे. विशिष्ट समाजाच्या विरोधात वक्तव्य करून या राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाईच्या विरोधात, बेरोजगारीच्या विरोधात जनता बोलेल म्हणून मुद्दाम जातीय तेढ निर्माण केले जात आहे. मोदी सरकार सत्तेत येण्याच्या अगोदर आणि नंतर महागाईचा दर पाहिला तर लक्षात येते मोदी सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राला जाणून बुजून बदनाम केले जात आहे मात्र कोरोना काळात राज्यात उत्कृष्ट काम झालं आणि संपूर्ण जगाने त्याचे कौतुक केले आपला आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांनी उत्कृष्ट काम केले आणि त्यांच्या बरोबरीने अन्न, नागरी पुरवठा विभागाने देखील चांगले काम केले. लॉकडाऊन काळात देखील राज्यात अन्न, धान्य पुरवण्याचे काम आम्ही केले. राज्यात अनेक संकटे आली मात्र राज्याने त्याचा निकराने लढा दिला. अनेक वादळे आली मात्र राज्याने जनतेसाठी काही हजारो कोटींची पॅकेज देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले आहे. कोविड महामारीच्या काळात सरकारने बांधकाम कामगार, माथाडी कामगार, घरेलु कामगार, सुरक्षा रक्षक अशा एकुण १३ लाख ०३ हजार कामगारांना ७१५ कोटी रुपयांचे अर्थसह्हाय दिले आहे. या व्यतिरीक्त ऑटो सायकल रिक्षा चालक, छोटे व्यापारी, फेरीवाले आदी अनेक गरजू घटकांना आर्थिक तसेच अन्नधान्यांची मदत केली आहे. राज्य शासनाने जून ते ऑक्टोबर २०२१ कालावधीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीकरता ५ हजार ५४४ कोटी १० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांना मदत म्हणुन उपलब्ध करुन दिला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित झाले आहे. आणि याचा फटका फक्त महाराष्ट्रच नाहीतर देशभरातील ओबीसींना बसत आहे. काही मंडळी कोर्टात गेल्यामुळे ओबीसी घटकाचे राजकीय आरक्षण स्थगित झाले मात्र राज्य सरकारने लगेच न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. आणि आम्ही ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत शांत बसणार नाही. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे. ओबीसी म्हणून एकत्र राहिलात तरच प्रश्न सुटतील असे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की भुजबळ साहेबांनी आयुष्य हे समाजासाठी दिलेले आहे. आणि हे आयुष्य जगत असताना सातत्याने त्यांना संघर्षच करावा लागला आणि आजही त्यांचा संघर्ष सुरूच आहे. आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार राज्यात पोहचविण्यासाठी ते काम करत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.