ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या मसेवाडीकरांनी रस्ताच जेसीबीने खोदला;रास्ता रोकोचा ईशारा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

By : Polticalface Team ,Fri Apr 08 2022 20:33:29 GMT+0530 (India Standard Time)

ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या मसेवाडीकरांनी रस्ताच जेसीबीने खोदला;रास्ता रोकोचा ईशारा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर बीड: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामविकास विभागामार्फत रा. मा. ५६ ते मुळुकवाडी-मसेवाडी रस्ता सुधारणा काम लांबी ०/०० ते २/८०० पॅकेज क्रमांक RDBEE-23,कामाची अंदाजे किंमत १ कोटी २६ लाख रूपये असुन मे. रूद्रा कन्स्ट्रक्शन औरंगाबाद या कंत्राटदारामार्फत करण्यात येत असेलेल काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ठीकठीकाणी अर्धवट असुन गावातील एका धनदांडग्याच्या सांगण्यावरून ईतर ग्रामस्थांना वेठीस धरून मनमानी कारभार करत असल्याने ग्रामस्थांनी जिल्हाप्रशासनातील आधिका-यांना लेखी तक्रार करून सुद्धा कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेरीस आज दि.८ एप्रिल रोजी सकाळी वैतागलेल्या ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने गावात जाणारा रस्ताच खोदुन ठेकेदार व प्रशासनाचा निषेध नोंदवला.
गुरूवार रोजी मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम
साधारणतः २०१५ मध्ये मुळुकवाडी ते मसेवाडी या रस्त्याचे सुधारणा काम २५ लाख रूपये खर्च करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या. (औरंगाबाद)यांच्या मार्फत करण्यात आले होते त्यानंतर सध्या १ कोटी २६ लाख रूपये किंमतीचे काम सुरू असून काम बोगस असुन गावातील सिमेंट रस्त्यासाठी एक्सपायरी डेटचे सिमेंट वापरल्यामुळे ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. त्याचबरोबर अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसुन मनमानी पद्धतीने रस्ता वळवुन काम होत असल्याच्या निषेधार्थ जेसीबीने रस्ताच खोदला असुन गुरूवार रोजी मुळुकवाडी फाट्यावर मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर गुरूवार रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा ईशारा मसेवाडीकरांनी दिला आहे.
निकृष्ट रस्त्याप्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते:-डाॅ.गणेश ढवळे
मुळुकवाडी-ते मसेवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामविकास विभागामार्फत करण्यात येत असलेल्या बोगस रस्त्याचे काम ठेकेदार आणि प्रशासकीय आधिकारी संगनमतानेच करत असून संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२१ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी