आदिनाथनगर येथे स्पर्धा परीक्षेसाठी एक दिवसीय कार्यशाळा

By : Polticalface Team ,Sat Apr 09 2022 19:51:34 GMT+0530 (India Standard Time)

आदिनाथनगर येथे स्पर्धा परीक्षेसाठी एक दिवसीय कार्यशाळा पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादा पाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व युनिक अकॅडमी, पुणे यांच्या अहमदनगर येथील शाखेच्या संयुक्त विद्यमाने पदवी काळात राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावर नुकतीच एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी युनिक अकॅडमीच्या अहमदनगर शाखेतील तज्ञ मार्गदर्शक म्हणून सुनिल देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी देशमुख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेचे स्वरूप, त्याचा अभ्यासक्रम, त्यासाठी आवश्यक असणारे संदर्भग्रंथ व पदवी काळात विद्यार्थ्यांनी कोणत्या अभ्यास पद्धतीचा अवलंब करावा, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी श्री.सुनील देशमुख यांनी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे. टेमकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून डॉ. टेमकर यांनी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. राजू घोलप यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या मानसिकतेचा विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न पदवी शिक्षण घेत असतांनाच करावेत, असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख डॉ. के. जी. गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या वतीने तर गोपाल सैंदाणे यांनी युनिक अकॅडमीच्या अहमदनगर शाखेच्या वतीने समन्वयक म्हणून काम पाहिले. या कार्यशाळेसाठी वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख डॉ. एस. जे. देशमुख, ग्रंथपाल डॉ. आर. पी. घुले उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अमोल आगाशे यांनी तर आभार डॉ. अतुल चौरपगार यांनी मांडले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. आसाराम देसाई, प्रा. रोहित आदलिंग, डॉ. डी. एन. कांडेकर, प्रा. अस्लम शेख, प्रा. चंद्रकांत पानसरे व प्रा. योगिता इंगळे यांनी सहकार्य केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी