कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनची स्थापना अध्यक्षपदी अ‍ॅड. शिवाजी (आण्णा) कराळे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. लक्ष्मण कचरे, तर सचिवपदी अ‍ॅड. अनिता दिघे यांची नियुक्ती

By : Polticalface Team ,Sat Apr 09 2022 19:58:53 GMT+0530 (India Standard Time)

कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनची स्थापना
अध्यक्षपदी अ‍ॅड. शिवाजी (आण्णा) कराळे,  उपाध्यक्षपदी अ‍ॅड. लक्ष्मण कचरे, तर सचिवपदी अ‍ॅड. अनिता दिघे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशन अहमदनगर ची स्थापना करण्यात आली. स्थलांतर होऊन जुन्या जिल्हा न्यायालयात सुरु झालेल्या कौटुंबिक जिल्हा न्यायालयाच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांच्या हस्ते फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षपदी अ‍ॅड. शिवाजी (आण्णा) कराळे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. लक्ष्मण कचरे, कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. सुरेश लगड व सचिवपदी अ‍ॅड. अनिता दिघे सहसचिवपदी अ‍ॅड. अर्चना शेलोत, खजिनदारपदी अ‍ॅड. राजेश कावरे, सदस्यपदी अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड. मच्छिंद्र आंबेकर, अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के, अ‍ॅड. शिवाजी सांगळे, अ‍ॅड. सुचिता बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यायाधीश नेत्राजी कंक म्हणाल्या की, फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनमुळे कौटुंबिक न्यायदानाच्या प्रक्रियेत मदत होणार आहे. वकिल, पक्षकार यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बार असोसिएशनची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. वकिली व्यवसायात प्रत्येकाला ताण-तणावाचा सामना करावा लागतो. प्रत्येकाने आनंदी जीवन जगण्यासाठी विचारावर नियंत्रण ठेऊन तणावमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले. नूतन अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी (आण्णा) कराळे यांनी वकीलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी बार असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असून, सर्व वकील बांधवांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अहमदनगर शहर वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल सरोदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. वांढेकर, अ‍ॅड. निर्मला चौधरी, अ‍ॅड. सेलोत, अ‍ॅड. उजागरे, अ‍ॅड. राशीनकर आदींसह पक्षकार उपस्थित होते. मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी...................
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी