क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी देशात स्वातंत्र्य, समता व बंधुतेची बीजे रोवली - मंत्री छगन भुजबळ

By : Polticalface Team ,Mon Apr 11 2022 22:38:25 GMT+0530 (India Standard Time)

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी देशात स्वातंत्र्य, समता व बंधुतेची बीजे रोवली - मंत्री छगन भुजबळ येवला,दि.११ एप्रिल :- आद्यसमाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांनी बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त केलं. स्वातंत्र्य, समता व बंधुतेची बीजे रोवत देशात सामाजिक क्रांती घडवून आणली असे सांगत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. आद्यसमाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची आज १९५ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, ज्येष्ठ नेते आंबदास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, येवला बाजार समिती प्रशासक सभापती वसंत पवार, नगरसेवक दिपक लोणारी, अडतीसगाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, संतोष खैरनार, सुभाष गांगुर्डे, भाऊसाहेब धनवटे, गोटू मांजरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. देशात अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांवर हल्ला करुन प्रबोधनाची चळवळ उभारली. शेतकरी, कष्टकरी, महिला व उपेक्षित बांधवांना हक्कांची जाणीव करुन देत लढण्याचं बळ दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. देशाला पुढे नेणारा, सामाजिक क्रांती घडवणारा विज्ञानवादी, सत्यशोधक विचार त्यांनी दिला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, समाजातील पिडीत आणि वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. देशात स्वातंत्र, समता व बंधुता याचे बीज समाजात रोवले. त्यामुळे देशात मोठी सामाजिक क्रांती झाली. त्यांचे विचार अविरत रुजविण्याचा निर्धार त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण करूया असे आवाहन त्यांनी केले. तसेच महात्मा फुले यांच्या प्रगत, पुरोगामी, सत्यशोधक विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल सुरु असून ती अविरत सुरू राहील. या देशाला एकसंघ ठेवण्यात त्यांचे विचार अतिशय उपयोगी आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.