विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराज शौर्य स्तंभ येथून तथागत नगर पर्यंत समता मशाल रॅली संपन्न

By : Polticalface Team ,Fri Apr 15 2022 10:47:19 GMT+0530 (India Standard Time)

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराज शौर्य स्तंभ येथून तथागत नगर पर्यंत समता मशाल रॅली संपन्न पेडगाव: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ऐतिहासिक पेडगाव मध्ये समता मशाल रॅली काढून समतेचा आणि एकतेचा संदेश देण्यात आला. या रॅली मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांसह सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. सुरुवातीस तथागत नगर येथील नालंदा विहारात मा. उपसरपंच अहमदभाई पिरजादे यांच्या हस्ते प्रा नितीन घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी समता व एकतेचा संदेश देणारी मशाल पेटवून रॅली काढण्यात आली.त्यानंतर रॅली ग्रामपंचायत कार्यलयासमोर पोहचली, सरपंच सौ सुलोचना कणसे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर ही रॅली बहादूर गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यस्थळ येथे पोहचली. शौर्यस्थळावर संभाजी महाराजांना अभिवादन करून अण्णाभाऊ साठे नगर मार्गे तथागत नगर पर्यंत काढण्यात आली. फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारे फलक रॅलीत पहावयास मिळाले. या कार्यक्रमास सरपंच सौ सुलोचना कणसे, उपसरपंच सौ पूजा कणसे, भगवानराव कणसे,प्रकाश घोडके,दीपक म्हस्के, प्रकाश म्हस्के, भीमराव मस्के राजेंद्र पंडित प्रेम खेडकर ,इरफान काझी, इरफान पिरजादे, महेंद्र मस्के, वसंत सकट दाजी, सुभाष दिवटे, म्हनडुळे भाऊ साहेब, नारायण कणसे, साहिल शेख, ननुभाई चौधरी, भाऊसाहेब घोडके, विनोद मस्के , अमोल घोडके, सिद्धार्थ खेडकर अहमद पिरजादे, घोडके काळू, मस्के युवराज, युवराज घोडके किरण शिंदे, जालिंदर खेडकर, अभिजीत घोडके, विजय काराळें सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, हिंदू मुस्लिम समाज बांधव व पेडगाव ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. गेले चार दिवसांपासून सुरू झालेल्या या प्रभोधनात्मक कार्यक्रमात पहिल्या दिवशी अलकताई गायकवाड यांनी मी रमाई बोलते हे एकपात्री नाटक सादर केले, दुसऱ्या दिवशी प्रकाश वाघमारे लिखित भीमा तुझ्या जन्मामुळे हे महानाट्य,तिसऱ्या दिवशी प्रा. प्रशांत चव्हाण यांचे व्याख्यान व चौथ्या दिवशी निळा ध्वज अनावरण व रॅली असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यासाठी नितीन घोडकेसर, ग्रा पं. सदस्य प्रकाश आबा घोडके, दीपक म्हस्के, राहुल घोडके व त्यांच्या सर्वच युवक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्रोत:
भगवान कणसे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी