अतिक्रमित ईनामी दर्गाह बांधकामाचे फोटो काढले म्हणून पत्रकाराला लोखंडी गज, दगडाने मारहाण;पाटोदा येथिल प्रकार पत्रकार शेख जावेद यांना मारहाण:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
By : Polticalface Team ,Fri Apr 15 2022 11:15:34 GMT+0530 (India Standard Time)
पाटोदा शहरातील राजमहंमद चौक सांगवी रोड स्थित राजमहंमद दर्गाह मस्जिद ईनामी जमिन सर्व्हे नंबर ७१४ पाटोदा या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम करण्यात येत असून त्या बांधकामाचे फोटो काढले म्हणून मराठी पत्रकार परीषद महाराष्ट्र राज्य पाटोदा तालुकाध्यक्ष सोशल मिडीया प्रमुख पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक वय ३८ वर्षे यांच्यावर आज दि.१३ एप्रिल २०२२ बुधवार रोजी दुपारी ४ वा. वाजता शेख वाजेद यांच्या समीर सायकल स्टोअर्स दुकानात येऊन समद शेरखा पठाण व त्याचा मुलगा समीर समद पठाण यांनी कोणाला विचारून फोटो काढले म्हणत लोखंडी गजाने व दगडाने मारहाण केली.
त्यानंतर शेख जावेद यांचे बंधु शेख वाजेद रज्जाक, शेख इरफान इब्राहिम यांनी शेख जावेद यांना वाचवले,
नंतर त्यांना पाटोदा येथिल ग्रामिण रूग्णालयात दाखल केले, डाॅ.सावंत यांनी प्रथमोपचार करून डोक्याला मार लागला असून नाकातून रक्त येत असून चकरा येत असल्यामुळे बीड जिल्हा रूग्णालयात रेफर केले असून बीड जिल्हा रूग्णालयाकडे रवाना होत आहेत.
वाचक क्रमांक :