By : Polticalface Team ,15-11-2022
मुंबईतील गोवरचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मुंबईतील 12 विभागात रुग्णसंख्या मोठ्या संख्येनं वाढलीय. अनेक संशयित रुग्णांना मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वाधिक रुग्णसंख्या एम-पूर्व विभागात असून गोवंडीत रुग्णसंख्या अधिक आहे. केंद्रीय उच्चस्तरीय समिती गोवराबाबद राज्य सरकारकडं सविस्तर अहवाल देणार आहे. केंद्रीय पथकातील सदस्यांकडून ठिकठिकाणी आढावा घेतल्यानंतर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
दरम्यान गोवराचा उद्रेक झालेल्या विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज ताप, पुरळ असलेल्या नवीन रुग्णांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. लक्षणं असलेल्या रुग्णांना दुसऱ्या दिवशी पाठपुरावा करणं, अतिरिक्त लसीकरण सत्राचं आयोजन करणं, रुग्ण दाखल करण्याच्या सुविधा वाढविणं, आरोग्य सेविका आणि खासगी डॉक्टरांना गोवरच्या उद्रेकाबाबत अवगत करणं, लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या वाचक क्रमांक :