मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, आमदार दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

By : Polticalface Team ,07-10-2023

मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, आमदार दत्तात्रय भरणे यांचे आवाहन इंदापुर (प्रतिनिधी जन आधार न्युज ): भरणेवाडी येथे उद्या मोफत ग्रामीण आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इंदापूर तालुक्यातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले आहे. रविवार दि.०८ ऑक्टोबर रोजी कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भरणेवाडी येथील ग्रामपंचायत प्रांगणामध्ये हे शिबिर संपन्न होणार असून भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने या शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हे शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश विषद करताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, कोरोना महामारी पासून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे निदर्शनास येत आहे. अलीकडच्या काळात आजारपणाला वयाचे कुठलेही बंधन राहिले नसून तालुक्यामध्ये फिरत असताना असंख्य नागरिक वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेले दिसत आहेत यामध्ये विशेषतः तरुण मुले आणि महिलांचे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये पुणे - मुंबई सारख्या मोठ-मोठ्या दवाखान्यांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांना महागडे उपचार करणे आवाक्या बाहेरचे बनले आहे.त्यामुळे आपण हे शिबिर आयोजित केले असून यामध्ये ससून रुग्णालयातील नामांकित तज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याकडे येणार आहे यामध्ये नेत्ररोग,डोळे तपासणी व चष्मेवाटप,स्त्रीरोग,मेंदू रोग,कर्करोग,हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार,कान,नाक व घसा तपासणी,ग्रंथीचे विकार,त्वचा व गुप्तरोग, जनरल सर्जरी,लठ्ठपणा, दंतरोग,श्वसनविकार व क्षयरोग,मानसिक आरोग्य, जनरल मेडिसिन,बाल आरोग्य,प्लास्टिक सर्जरी,मूत्ररोग अशा वेगवेगळ्या आजारांवर मोफत तपासणी चाचण्या, औषधोपचार व शस्त्रक्रिया पार पडणार असल्याचे आमदार भरणे म्हणाले.
तसेच या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आभा ओळखपत्र व आयुष्यमान भारत ओळखपत्र काढण्यासाठी नोंदणी कॅम्प सुद्धा दिवसभर चालणार आहे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरही पार पडणार आहे.तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार भरणे यांनी केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


बारामती प्रतिनिधी .भिमसेन जाधव
जन आधार न्युज

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.