By : Polticalface Team ,21-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता २१ जुलै २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील समस्त ग्रामस्थ गावकऱ्यांनी पंढरपूर च्या वारी नंतर नेहमी प्रमाणे आखाड्याच्या पहिल्या रविवारी दि २१ जुलै २०२४ रोजी गाव वन भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान व श्री महालक्ष्मी ( लक्ष्मी आई ) देवीचा छबीना सकाळी १० वाजता काढण्यात आला होता पारंपरिक ढोल ताशे हलगी संबळ वाद्यांच्या धूम धडाक्यात पोतराज गोंधळी यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून. गाव प्रदक्षिणा दरम्यान समस्त ग्रामस्थांचे क्षल वेधले होते. श्री काळभैरवनाथ महालक्ष्मी लक्ष्मी आई देवीचा छबीना गाव प्रदक्षिणा होताच गावातील सर्व व्यापारी दुकानदार बांधवांनी तत्काळ दुकान व्यावसाय बंद केले. संपूर्ण गाव कडकडीत बंद झाले. तसेच यवत गावातील पुणे सोलापूर महामार्गावरील लहान मोठे हॉटेल उद्योग व्यापारी दुकानदार व्यावसायिकांनी देखील वन भोजनाच्या निमित्ताने व्यावसाय बंद ठेऊन शेतमळ्यात डोंगर झाडी भुलेश्वर मंदिर परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात जाने पसंत केले. या प्रसंगी गावातील युवा तरुणांनी कबड्डीचा खेळ मांडला होता तर काहींना आकाशात पतंग उडविण्याचा मोह आवरता आला नाही. निसर्ग देवतेचा मनापासून आनंद घेऊन मन प्रसन्न झालं असल्याचे दिसून आले. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून निसर्गाच्या सान्निध्यात दुपारी वन भोजनाचा आनंद घेतला. यवत गावातील सर्व प्रवेश मार्गावर ठिक ठिकाणी दोरी बांधून टु व्हिलर मोटर सायकल फोर व्हीलर गाड्यांना गावात फिरवणे बाबत बंदी करण्यात आली होती. दिवसभर गावात सुक सुकाट असल्याचे पाहून कोरोना काळातील भयानक परिस्थितीची जाणीव झाली.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी अभंगाच्या माध्यमातून दिलेला उपदेश आठवतो. रुक्ष वंल्ली आम्हा सोयरे वन चरे ! पक्षीही सुस्वरे आळवीती येणे. सुखे रुजे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन. रमे तेथे मना क्रीडा करी. कथा कमांडलो देह उपचारा. जानवितो वारा अवसरू. हरी कथा भोजन परवडी विस्तारा. करुनि प्रकार सेवूं रुची. तुका म्हणे होय मनाशी संवाद. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वारीत सहभागी होऊन आषाढी एकादशीला पंढरपूर नगरीत विठ्ठल रखुमाई मंदिरावरील कळसाचे दर्शन घेऊन येताच यवत गावातील नागरिकांना वन भोजनाच्या निमित्ताने निसर्ग देवतेची पूजा करण्याची ही परंपरा कायम राखली आहे. या प्रसंगी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतिश कोंडीबा दोरगे माजी अध्यक्ष शंकराव दोरगे यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सदानंद दोरगे श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे सदस्य दत्तात्रय दोरगे पाटील कैलास आबा दोरगे रघुनाथ दादा दोरगे गणपतराव दोरगे दिलीपराव दोरगे चंदकांत दादा दोरगे अनिल काका अवचट अशोक शेंडगे भगवान गायकवाड काळुराम शेंडगे दादा जाधव वसंत सापळे यवत गावातील गोंधळी छबनराव काटम बाबुराव काटम काशिनाथ काटम रमेश गोंधळी आदी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.