छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मानवतेचा व समानतेचा- प्रा.अफसर शेख

By : Polticalface Team ,18-01-2025

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मानवतेचा व समानतेचा-  प्रा.अफसर शेख लिंपणगाव (प्रतिनिधी) लोकनेते, मा.आ.शिवाजीराव नारायणराव नागवडे (बापु) यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. द्वितीय पुष्प गुंफण्याकरता शिवव्याख्याते प्रा.अफसर शेख उपस्थित होते. प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी शिवव्याख्याते प्रा.अफसर शेख यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश रसाळ यांनी केले तर पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे उपप्राचार्य चंद्रभान कातोरे यांनी करून दिली. शिवव्याख्याते प्रा.अफसर शेख यांनी “श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा महाराष्ट्र” या विषयावर व्याख्यान दिले.त्यांनी महाराजांचे संस्कार आपण विसरत चाललो आहोत. महाराजांचे ६ कार्य म्हणजे राजेंची दूरदृष्टी, शिस्त, शास्त्र, शस्त्र, संघटन आणि प्रशासन महत्वाचे आहेत. इतिहासात एकमेव राजा पाठीवर ढाल आणि हातात तलवार असणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी होय.शिवाजी महाराजांचे विचार आज लाख मोलाचे आहेत.आयुष्यात जिजाऊ नाही होता आले तरी चालेल पण एक तरी शिव चरित्राचा गुणधर्म आपल्या मुलांमध्ये उतरवा. तुमच्या आयुष्यात महाराज नाही होता आले तर तुमच्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्या अशी मुलांकडून आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागवडे कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव रायकर यांनी भूषविले.त्यांनी बापू स्वभावाने व आचरणाने आदरणीय होते असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.योगेश शेलार व प्रा.प्रवीण नागवडे यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.प्रमोद परदेशी यांनी केले. या कार्यक्रमानंतर पारंपरिक पोषाख सादरीकरण झाले. यानंतर समाज परिवर्तन हा एकांकिकेचा विषय घेऊन अत्यंत सुंदर एकांकिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या.तसेच बॉलिवूड पोषाखाचे सादरीकरण बॉलिवूड पोषाख सादरीकरण झाले. या कार्यक्रमासाठी भाऊसाहेब नेटके,मुकुंद सोनटक्के, डॉ.धर्मनाथ काकडे,पोपटराव बोरुडे,निशिकांत निंभोरे,विजय मुथा,बाळासाहेब काकडे,समिरानजी नागवडे,आमीन शेख,हरिदास खेतमाळीस,बाळासाहेब भोर,राजेंद्र हिरवे,दत्ता जगताप,श्रीरंग साळवे उपस्थित होते तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिक, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.