महिला बचत गट. सचिव- सदस्य यांच्यात पैशाच्या घोळावरुन हाणामारी, दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. सोनवडी तांडा येथील घटना.

By : Polticalface Team ,25-06-2024

महिला बचत गट. सचिव- सदस्य यांच्यात पैशाच्या घोळावरुन हाणामारी, दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. सोनवडी तांडा येथील घटना.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता 25 जून 2024 दौंड तालुक्यातील मौजे सोनवडी तांडा ता. दौंड. जिल्हा पुणे. येथील महिला बचत गटातील सदस्या सुमन परशुराम पवार. व सचिव अनिता अनिल पवार. यांच्यात पैशाच्या घोळावरुन बोलता बोलता वाद निर्माण होऊन शिगेला पोहोचला या वेळी एकमिकिंच्यात चांगलीच धराधरी झाली. स्वयंसहाय्यता बचत गटाचे उद्योग चव्हाट्यावर आले असून.हि घटना दि. 24 जून रोजी सोनवडी तांडा येथे घडली आहे. हि भांडणे त्यांच्या गट मर्यादीत राहणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही. बचत गटातील महिलांच्या व्यावहारिक भांडणाचे पडसाद त्यांच्याच मुलांनमध्ये उमटले असल्याचे दिसून आल्याने. सोनवडी तांडा. गावात चर्चेला उधाण आले आहे. महिला स्वयंसहायता बचत गटाची स्थापन करण्या मागचे नेमका हेतू काय ? संकल्पना काय ? आहे. याचा सदर महिलांना विसर पडला आहे काय ? असा प्रश्न निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. या बाबत अधिक सविस्तर माहिती अशी की दि 24 जून रोजी सकाळी 10: वाजे सुमारास सुमन पवार. यांची मोठी बहीण पारुबाई चव्हाण. हिच्या घरी बचत गटाचे पैसे जमा करण्यासाठी गेली असताना. तिथे गटाचे सचिव अनिता पवार. बचत गटाचे. जमा पैसे घेण्याकरीता आल्या होत्या. त्या वेळी बचत गटातील पैश्याच्या घोळावरुन दोघींमध्ये. बोलता बोलता वाद निर्माण होऊन. एकमेकींना खरपुस शिवीगाळ झाली मात्र एवढ्यावर या दोन्ही महिलांचे समाधान झाले नाही. शेवटी धराधरी ओढा ओढी करत हाताने मारहाण सुरू झाली. भांडणे काय थांबता थाबेना. या प्रसंगी गटातील सदस्या पारुबाई चव्हाण यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडवून मिटवण्याचा प्रेयत्न केला. व दोन्ही महिलांना घरी पाठवले. मात्र गटाचे सचिव अनिता अनिल पवार यांचा मुलगा अनिकेत अनिल पवार. हा फियादी च्या घरी जाऊन म्हणाला. तु माझ्या आईला मारहाण का ? केली. असे‌. म्हणून शिवीगाळ व दमदाटी करत अनिकेतने त्याच्या जवळील कुन्हाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण केली या मध्ये सुमन पवार. यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर मार लागला असुन‌. सुमन पवार यांचा मुलगा गौरव हा भांडणे सोडविण्या करीता आला असता. त्यालाही दाड्यांने मारहाण केली. त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर मार लागला. असल्याचे फियादी मध्ये नमूद करण्यात आले आहे, सदर बचत गटातील पैश्याच्या घोळातून महिलांची भांडणांचे पडसाद त्यांच्याच मुलांनमध्ये उमटले आहेत. हि मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात असुन. स्वयंरोजगार महिलांचा बचत गट हा नेमका कशासाठी निर्माण करण्यात आला आहे. या बाबत अनेकांना प्रश्न पडल्या शिवाय राहणार नाही. हि घटना दि 24 जून 2024 रोजी दुपारी 1 वाजे सुमारास मौजे सोनवडी तांडा ता दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत घडली असल्याने. दौंड पोलिस स्टेशन येथे फियादी. सुमन परशुराम पवार, 32 वर्ष रा सोनवडी तांडा. ता दौंड जिल्हा पुणे यांच्या फिर्यादी वरून आरोपी 1) अनिता अनिल पवार 2) अनिकेत अनिल पवार. दोघे रा. सोनवडी तांडा, ता. दौंड जि पुणे. यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अधिकारी - सपोनि/गटकुळ सो.पो हवालदार भोसले पुढील तपास करीत आहेत.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते