नवरी मुलीचे आई वडील नवरदेव पाहायला आले आहेत. त्यांना घेऊन येतो. असे सांगून मोबाईल व मोटर सायकल घेऊन इसम परास. दौंड येथील घटना.

By : Polticalface Team ,03-07-2024

नवरी मुलीचे आई वडील नवरदेव पाहायला आले आहेत. त्यांना घेऊन येतो. असे सांगून मोबाईल व मोटर सायकल घेऊन इसम परास. दौंड येथील घटना.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०३ जुलै २०२४ मी तुम्हाला भेटायला आलो आहे तुमचा मुलगा ऋषभ यास लग्नासाठी पाहिलेल्या मुलीचे आई वडील तुम्हाला भेटण्यासाठी व तुमचे घर पाण्यासाठी येणार आहेत असे सांगून. मोबाईल व मोटर सायकल घेऊन इसम परास झाला असल्याने. फिर्यादी नरेंद्र दामोदर निकाळजे वय ५८ वर्ष रा राज अपार्टमेंट बी.६ संस्कार नगर दौंड ता दौंड जिल्हा पुणे. यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे आरोपी - लखन झगडे ( पुर्ण नाव माहित नाही ) रा.पिंपरी चिंचवड, पुणे. याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना दि.01/07/2024 रोजी दुपारी 1:30 वा. चे सुमारास मौजे राज अपार्टमेन्ट बी/6 संस्कार नगर,दौंड ता. दौंड जि पुणे गावचे हद्दीत राहत असलेल्या अपार्टमेंट मध्ये घडली असून या बाबत अधिक माहिती अशी की. फिर्यादी यांचे ओळखीचे इसम नामे लखन झगडे; पूर्ण नाव माहित नाही. रा. पिंपरी चिंचवड, पुणे याने सांगितले मी तुम्हाला भेटाला आलो आहे. तुमचा मुलगा ऋषभ यास लग्नासाठी पाहीलेल्या मुलीचे आई वडील. तुम्हाला भेटण्यासाठी व तुमचे घर पाहण्यासाठी येणार आहेत. माझ्या मोबाईल फोन बंद झाला असून मला तुमचा मोबाईल फोन द्या मी मुलीचे आई वडील कोठपर्यंत आले आहेत या बाबत फोनवरून चौकशी करतो असे म्हणून फिर्यादीकडे मोबाईल फोन मागीतला असता सदर फिर्यादीने विश्वासाने मोबाईल फोन दिला. आरोपीने मोबाईल फोन वरून कोणाला तरी फोन करून गडबडीत फिर्यादीकडे आले. व म्हणाले की, मुलीचे आई वडील एच.डी.एफ.सी. बँकेचे समोर येवुन थांबलेले आहेत. त्यांना तुमचे घर माहीत नाही. तुमची मोटार सायकल मला दया मी त्यांना तुमचे घरी घेवुन येतो. असे म्हणून सदर आरोपीने मोबाईल व मोटर सायकल घेऊन पसार झाला आहे. असे नमूद करण्यात आले आहे. २० हजार रुपये किंमतीची मोटर सायकल. आणि ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन असे ऐकून 25 हजार रुपये किंमतीचा माल इसम नामे लखन झगडे (पुर्ण नाव माहित नाही) रा.पिंपरी चिंचवड यास फिर्यादीने विश्वासाने दिली असता विश्वास घात करून मोबाईल व मोटर सायकल घेवून निघून गेला या बाबत फसवणुक झाली असल्याने सदर आरोपी विरुद्ध दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अमलदार पो.ना/पानसरे. पो हवालदार पांढरे पुढील तपास करीत आहेत.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते