भांडण सोडवण्यासाठी गेला. मात्र यालाच बेदम मार दिला,पारगाव येथील घटना. चौघांन विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,14-07-2024

भांडण सोडवण्यासाठी गेला. मात्र यालाच बेदम मार दिला,पारगाव येथील घटना. चौघांन विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता 13 जुलै 2024 यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पारगाव तळवाडी ता दौंड जिल्हा पुणे येथील घटना, फियादी किशोर महादेव सोनवणे, रा.पारगाव तळवाडी ता दौंड जिल्हा पुणे. यांच्या तक्रारी वरून. आरोपी 1) गौरव राजेंद्र ताकवणे, 2) अनिकेत खंडेराव ताकवणे, 3) रमेश श्रीराम झांझुर्णे, 4) आदेश सतिश ताकवणे. सर्व रा.पारगाव ता.दौंड.जि.पुणे. यांचे विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली, या बाबत अधिक माहिती अशी की, दि,12 जुलै 2024 रोजी पारगाव तळवाडी येथे सायंकाळी 6:30 वाजे सुमारास चुलत भावाच्या पत्नी बरोबर आरोपी 1) गौरव राजेंद्र ताकवणे, हा दररोज बोलत असल्याचे कारणा वरून. साक्षीदार व आरोपी यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन अचानक जोरदार वाद सुरू झाला. तो मिटवण्यासाठी. फिर्यादी किशोर महादेव सोनवणे यांनी मध्यस्थी केली असता. आरोपी 1) गौरव राजेंद्र ताकवणे याने जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करत धमकी देऊन हातातील लोखंडी फायटरने मारहाण केली, यामध्ये किशोर सोनवणे याच्या डाव्या डोळ्यावर जबर मार लागुन गंभीर दुखापत झाली, तसेच इतर तीन आरोपींनी मिळून लाथा बुक्यांनी मारहाण केली. असल्याने फिर्यादी किशोर महादेव सोनवणे यांच्या तक्रारी वरून. यवत पोलीस स्टेशन येथे BNS कायदा कलम. 118 (1), 115 (2), 352, 351 (2), 3 (5), सह अ.जा.अ.ज.अ का (Atrocities act) कलम 3 (1) (r), 3 (1) (s) नुसार आरोपी, 1) गौरव राजेंद्र ताकवणे, 2) अनिकेत खंडेराव ताकवणे, 3) रमेश श्रीराम झांझुर्णे. 4)आदेश सतिश ताकवणे. यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर घटना दि,12/07/2024 रोजी सांयकाळी 6ः30 वा.चे सुमारास मौजे पारगाव ता. दौंड. जि. पुणे गावचे हद्दीत तळवाडी येथील फिर्यादी यांच्या चुलत्याचे घरासमोर घडली असल्याचे नमूद करण्यात आले असून, तपासी अधिकारी श्री.आण्णासाहेब घोलप. सो उपविभागीय पोलिस अधिकारी, दौंड विभाग, दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून, यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख पुढील तपास करीत आहेत,

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते