खामगाव गाडमोडी चौकतील दुकानात शिरुन. सुरज राहुल भुजबळ याचा कोयत्याने खुन. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद.

By : Polticalface Team ,04-08-2024

खामगाव गाडमोडी चौकतील दुकानात शिरुन. सुरज राहुल भुजबळ याचा कोयत्याने खुन. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता ०३ ऑगस्ट २०२४ दौंड तालुका यवत पोलीस स्टेशन हद्दीतील. खामगाव गाडमोडी चौकातील राहुल सिलेक्शन या कपडाच्या दुकानात शिरूर धारदार कोयत्याने वार करून मयत सुरज राहुल भुजबळ वय २२ वर्ष रा खामगाव गाडमोडी ता दौंड जिल्हा पुणे. याचा खुन केल्याची धक्कादायक घटना दि ०३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४:३० वाजे सुमारास घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपीचे नाव अमित जयवंत बहिरट रा.खामगाव गाडमोडी ता दौंड जिल्हा पुणे. असे आहे. भर चौकात दिवसा ढवळ्या खुन झाल्याची संपूर्ण धक्कादायक घटना दुकाना बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यवत पोलिसांना सदर खुनाची खबर मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तसेच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब घोलप, यवत पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे आणि आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केलाया प्रसंगी मयत सुरज राहुल भुजबळ याच्या मृत देहाजवळ आक्रोश करीत बसलेल्या (आईने) सुवर्णा राहुल भुजबळ हिने जमिनीवरील मुलांच्या सांडलेल्या रक्ताच्या थारोळ्यातील वंजळभर रक्त हातात घेऊन. पोलीसांच्या अंगावर फेकत मुलांच्या खुनाचा आक्रोश करीत आईच्या काळजाने हंबरडा फोडुन यवत पोलिसान विरुद्ध निषेध व्यक्त केला. दोन ते तीन महिन्यांपूर्वी मयत सुरज राहुल भुजबळ याचे लग्न झाले असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनमध्ये बोलताना समजले. सदर खुन प्रकरण घटनेच्या अनुषंगाने यवत पोलीस पुढील तपास व कारवाई स्थळ पंचनामा बाबत पुढे येताच. आरोपीला अटक करीत नाही तोपर्यंत सुरजचा मृतदेह घटना स्थळावरून हलवण्यात नातेवाईकांनी नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयत सुरज राहुल भुजबळ यांच्या मृतदेहाला हात लावायचा नाही अशी आरोळी टाकत यवत पोलिसांना सुरजच्या आईने बजावले. आईच्या मायेच्या हंबरड्याने परिसरातील नागरिक थंक होऊन घटनास्थळी संन्नाटा पसरला होता. खुन झाल्याची धक्कादायक घटना काही वेळातच दौंड तालुक्यात व पुणे जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली यवत पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी अमित जयवंत बहिरट यास तत्काळ ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली. या बाबत अधिक माहिती अशी की. एक दिड वर्षांपूर्वी आरोपी अमित जयवंत बहिरट व संजना राहुल भुजबळ याच्यात प्रेम संबंध होऊन दोघांनी पळवून जाऊन आंतरजातीय विवाह रजिस्टर लग्न केले होते. मात्र काही दिवसांपूर्वी संजना मुंबई वरुन थेट खामगाव गाडमोडी येथे माहेरी परत आली. व चुक झाली आई पश्चाताप करत मी आता पतीकडे जाणार नाही. मला माफ कर. यावर (आई) सुवर्णा राहुल भुजबळ व (भाऊ) सुरज राहुल भुजबळ यांनी मुलगी- बहिणीला धीर देऊन आधार दिला. मात्र संजना चा पती यांच्यात वेळोवेळी भांडणे होत होती. या खुन प्रकरणातील मुख्य आरोपी १)अमित जयवंत बहिरट वय वर्ष २४ व २) समिर यशवंत बहिरट वय २२ वर्ष दोघे रा खामगाव गाडमोडी ता दौंड जिल्हा पुणे. यांनी संजना भुजबळ. सुवर्णा भुजबळ सुरज भुजबळ यांस जीवे मारण्याची धमकी दिल्याने सदर आरोपी १)अमित यशवंत बहिरट व २) समिर यशवंत बहिरट यांचे विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे वेळोवेळी तक्रार केल्या वरुन व पत्नी संजना भुजबळ हिला सोडचिट्टी देण्याचे मोबदल्यात आरोपी यास ५ लाख रुपये न दिल्याचा राग धरुन कट करण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 


  मयत सुरज भुजबळ याची आई सुवर्णा भुजबळ यांनी बोलताना सांगितले. या संदर्भात यवत पोलीसांनी वेळीच दखल घेऊन आरोपी १)अमित यशवंत बहिरट २) समिर यशवंत बहिरट याचा बंदोबस्त केला असता तर आज ही दुरदैवी घटना घडली नसती. आणि सुरज भुजबळ याचा जीव वाचला असता असे सांगितले. सदर घटनेला नेमके जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहत नाही. यवत पोलीस प्रशासनाने कर्तव्याचे पालन केले नाही. पोलीस प्रशासनाच्या कामगिरी बाबत नागरिकांनमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील संबंधित पोलिस कर्मचारी यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 


शनिवार दि ०३/०८/२०२४ रोजी खामगाव गाडमोडी चौकातील राहुल सिलेक्शन या कपड्यांच्या दुकानात आरोपी अमित बहिरट हा धारदार कोयता पाठीमागे धरुन दुकानात घुसला व सुरज भुजबळ यास धारदार कोयत्याने वार करून दुकानाच्या बाहेर ओढून परत सपासप कोयत्याने मानेवर वार केल्याने सुरज भुजबळ याचा जागीच मृत्यू झाला दुर्दैवी घटना दि ०३ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० दरम्यान खामगाव गाडमोडी चौकात घडली असल्याने एकच खळबळ उडाली होती. आरोपी अमित यशवंत बहिरट स्वतः यवत पोलीस ठाण्यात हजर झाला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सूरज भुजबळ याचा मृतदेह यवत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणला असून सदर खुनाच्या अनुषंगाने संबंधित आरोपी १) अमित यशवंत बहिरट २) समिर यशवंत बहिरट याचे विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गु.र.नं.784/2024 बी.एन.एस 103(1),351(2)(3),352,3(5) अंन्वेय गुन्हा रात्री उशिरा पर्यंत दाखल करण्यात आला आहे.

अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते