By : Polticalface Team ,07-08-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०७ ऑगस्ट २०२४ रोजी दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव ता. दौंड जि. पुणे येथील टेस्टी बाईट प्रा.लि. कंपनीत अमोनिया वायू गळती झाल्याने कंपनीचे फ्रोझन फुड प्रोडक्शन युनिट मध्ये रेफ्रीज रेशनसाठी वापरण्यात येणारे अमोनिया गॅस पाईप लाईन लिकेज झाल्याने कंपनीतील एकुण १७ कामगार मजूरांची प्रकृती बिघडल्याने त्यांना
भांडगाव येथील शिव मंगल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.४५ ते ७.५० वा.जे दरम्यान कंपनीचे फ्रोझन फुड प्रोडक्शन युनिट मध्ये रेफ्रीज रेशनसाठी वापरण्यात येणारे अमोनिया गॅस पाईप लाईन लिकेज झाल्याची घटना घडली आहे.
या मध्ये एकुण १७ कामगार मजुरांचा समावेश असुन त्यामध्ये २ पुरुष व १५ महिला मजुर कामगार आहेत.
१) माधुरी निंबाळकर -- पडवी २) भाग्यश्री मोरे -- देऊळगाव गाडा ३)जयश्री शितोळे -- पडवी ४)हमशेरा मल्लाड --भांडगाव ५)रशिदन बानू.-- भांडगाव ६)संगीता वाघ -- भांडगाव ७)रोहिणी यादव.-- यवत ८)रुपाली राऊत -- यवत
९)कैलास बोत्रे -- पारगाव १०)योगिता भंडलकर -- दापोडी
११)विशाल हंडाळ -- केडगाव १२) प्राजक्ता राऊत-- केडगाव चौफुला १३)नेहा फरगडे -- वरवंड १४) मंगल लउगड -- पाटस. कंपनी मध्ये अमोनिया गॅस पाईप लाईन लिकेज झाल्यामुळे घबराट होऊन त्रास होत असल्याने भांडगाव येथील शिव मंगल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहेत.
भांडगाव येथे उपचार घेत असलेल्या १) सौ. अलका संभाजी ढमरे, ३९ वर्षे, सध्या रा. भांडगाव ता. दौंड जि. पुणे २) सौ सपना सतिश शितोळे, वय ३५ वर्षे, रा. पडवी ता. दौंड जि. पुणे ३) सौ. दैवशाला मोहन शिंदे, रा.भांडगाव ता. दौंड जि. पुणे या तीन महिला मजुर कामगारांना श्वास घेण्यास त्रास दायक वाटत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी विश्वराज हॉस्पीटल, लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
मौजे भांडगाव ता. दौंड जि. पुणे येथील टेस्टी बाईट प्रा.लि. कंपनी फ्रोझन फुड प्रोडक्शन युनिट मध्ये. रेफ्रीज रेशनसाठी वापरण्यात येणारे अमोनिया गॅस पाईप लाईन लिकेज झालेने वायु गळती या अपघाता मधील कोणतेही मजुर कामगाराची प्रकृती गंभीर किंवा चिंताजनक नाही. सदर अपघाता मध्ये कोणतीही जीवीत हानी किंवा वित्तहानी झालेली नाही. अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली असून सदर घटनेचे अनुषंगाने अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.