माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिग्गज युवा नेते एकाच व्यासपीठावर मोहिते पाटील बंधू सह आमदार रोहित दादा पवार यांची उपस्थिती

By : Polticalface Team ,17-08-2024

माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिग्गज युवा नेते एकाच व्यासपीठावर मोहिते पाटील बंधू सह आमदार रोहित दादा पवार यांची उपस्थिती

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तीन युवानेते एकाच व्यासपीठावर, मोहिते पाटील बंधूसह रोहितदादा पवार यांची उपस्थिती असणार अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल यांनी दिली. येत्या शुक्रवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा वाढदिवस असून या निमित्ताने जेऊर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबद्दल माहिती देताना देवानंद बागल यांनी सांगितले की वास्तविक माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमानी साजरा केला जातो. ही गेली तीस वर्षांपासून चालू असलेली रीत आहे. पण तरीही यंदाचा वाढदिवस हा आम्हा कार्यकर्त्यांसाठी खास असून यानंतर सर्व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वस्व अर्पण करून व स्वतःला झोकून देऊन रनांगणात उतरावे लागणार आहे. आगामी निवडणुकीत नारायण (आबा) यांना विजयी करण्यासाठी युवकांची भूमिका फार महत्वाची ठरणार आहे. दिनांक 23 ऑगस्ट रोजी राज्यातील तीन युवानेते एकाच व्यासपीठावर येत आहेत. नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील व राज्यातील एक अभ्यासू युवानेतृत्व म्हणून ओळख असलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवा चेहरा म्हणून आपल्या भाषणानी राज्यातील सभा गाजवणारे आमदार रोहितदादा पवार यांनीही दिनांक 23 ऑगस्ट रोजी आपण येणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे हा दिवस युवकांसाठी प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे देवानंद बागल यांनी सांगितले. कार्यक्रमाची तयारी सुरु झाली असून मिनी मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबीर, मोफत नेत्र तपासणी शिबीर या सामाजिक तसेच क्रीडा उपक्रमांसाहा कर्मयोगी व्याख्यानमाला आयोजित केली गेली आहे. जेऊर येथील दिनांक 22 व 23 ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमास करमाळा माढा तालुक्यातील नागरिकांसह युवकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आव्हान देवानंद बागल यांनी केले.यावेळी सभापती अतुल पाटील, सरपंच पृथ्वीराज पाटील, प्रा अर्जुनराव सरक, प्रा डॉ संजय चौधरी, उपसरपंच नागेश झाजूरणे,विनोद गरड, संदीप कोठारी उपस्थित होते.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते