माजी सैनिकांना राजकारणात संधी देण्यासह अन्य मागण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादांचा सकारात्मक प्रतिसाद - राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के

By : Polticalface Team ,18-08-2024

माजी सैनिकांना राजकारणात संधी देण्यासह अन्य मागण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादांचा  सकारात्मक प्रतिसाद - राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के

पुणे प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिन तसेच कारगिल विजय दिनाला 25 वर्षे पूर्ण झाल्याने "रौप्य महोत्सवी सोहळा" दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सन्माननीय उपमुख्यमंत्री ना. मा.श्री. अजितदादा पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार मा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी नेते तथा राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपकराजे शिर्के, आमदार मा.श्री. सुनीलजी आण्णा टिंगरे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सूरजजी चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सुरेशजी आण्णा घुले, प्रदेश सरचिटणीस लतिफजी तांबोळी, लोहगावचे जेष्ठ नेते मा. श्री. पांडुरंग आप्पा खेसे व लोहगाव वडगांव शेरी नगरीचे प्रमुख नेते मंडळींसह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत लोहगाव, पुणे येथे संपन्न झाला.

याप्रसंगी प्रथमतः ध्वजारोहण करून कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर सैनिकांना मानवंदना देऊन, अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून सलामी देण्यात आली. यावेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विर-पत्नी, वीर माता-पीता कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या वीर सैनिकांचा, माजी सैनिकांचा सन्मान राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

सैनिक संवाद मध्ये सैनिकांच्या विविध महत्वाच्या मागण्या अजित दादांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या व लवकरात लवकर यावर सकारामत्क निर्णय घेऊ असा विश्वास दिला:-

१.  लोहगाव मधे शहीद स्मारक व सैनिक भवन व्हावे.

२.   सध्या पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय खूपच छोटे असल्याने मोठी इमारत मिळावी.

३.   गावातील पोलीस पाटील हे पद माजी सैनिकांना राखीव असावे.

४.   माजी सैनिकांना राजकीय क्षेत्रात आरक्षण मिळावे .

५.   गावातील ग्रामपंचायत मधील तंटामुक्ती समिती अध्यक्ष पद हे माजी सैनिकांना राखीव असावे.

६.   युद्धात शहीद झालेल्या वीर पत्नींना व मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावे.

७. सैनिकांच्या कामकाजासाठी निर्माण केलेल्या सैनिक कल्याण मंत्रालयात मंत्र्याची स्वतंत्र नियुक्ती व्हावी.

      यावर हजारो माजी सैनिकांनी "भारत माता की जय"...जय जवान जय किसान जय राष्ट्रवादी...घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल यांनी केले. सैनिक संवाद व सन्मान सोहळ्यास हजारो माजी सैनिकांनी उपस्थित होते.

प्रकाश म्हस्के
संपादक

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते